लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा रेल्वे स्थानकातील इंडियन रेल्वे टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) द्वारा संचालित भोजनालयात किचनमध्ये झुरळ, उंदीर आणि घुशींनी हैदोस घातला आहे. कॅन्टीनमध्ये खड्डे पडले असून, विद्युत केबल जीवघेणी ठरत आहे. हे विदारक चित्र मुंबई येथील आयआरसीटीसी पथकाने धाडसत्र राबविताना रविवारी प्रत्यक्ष अनुभवले. त्यामुळे भोजनालय पाच दिवस सील करण्यात आले.रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी कॅन्टीन, भोजनालय आदींची सुविधा रेल्वे प्रशासनाने केली आहे. आयआरसीटीसीच्या माध्यमातून चांगले आणि दर्जेदार जेवण कॅन्टीनमधून मिळावे, त्याकरिता कंत्राट प्रणाली लागू झाली. बडनेरा रेल्वे स्थानकावरही आयआरसीटीसीचे भोजनालय अनेक वर्षांपासून चालविले जाते. परंतु, तेथील किचनमध्ये झुरळ, उंदीर व घुशींचे वास्तव्य असल्याने ते प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ ठरत आहे. किचनमध्ये पाल, घुशी, उंदीर आणि झुरळाचे थवे आयआरसीटीसीच्या चमुने बघताच ते अवाक् झाले. हे ‘भोजनालयाचे किचन की भूतखाना’ असे एका अधिकाºयांच्या मुखातून आपसूकच बाहेर पडले. त्यामुळे ते भोजनालये नव्हे, तर आजारालये, अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना जेवण, नास्ता, चहा, कॉफी व दूध आदी खाद्य पदार्थ निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.आदेश झुगारून खाद्यपदार्थ विक्री सुरूआयआरसीटीसीच्या पथकाने धाडसत्र राबवून बडनेरा रेल्वे स्थानकावरील भोजनालय रविवारी सील केले. मात्र, कॅन्टीन संचालकांनी रेल्वे प्रशासनाच्या आदेशाला झुगारत सोमवारी भोजन, नास्ता आदी खाद्यपदार्थाची विक्री चालविल्याचे दिसून आले. त्यामुळे भोजनालय संचालकांच्या मग्रुरीने सीमा ओलांडल्याचे स्पष्ट होते.मुंबई येथील आयआरसीटीसीच्या पथकाने रविवारी कॅन्टीनची पाहणी केली. झुरळ, उंदीर आणि घुशींनी हैदोस घातल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जागोजागी खड्डे पडलेत. विद्युत केबलची नासधूस झाली. प्रवाशांच्या आरोग्याशी हा खेळ चालविला असून, वस्तुनिष्ठ अहवाल दिल्ली येथे पाठविला जाईल.- शरद सयाम,वाणिज्य निरीक्षक (मुख्य खंड) बडनेरा रेल्वे
बडनेऱ्यात रेल्वे भोजनालयात झुरळ, उंदीर अन् घूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 10:33 PM
बडनेरा रेल्वे स्थानकातील इंडियन रेल्वे टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) द्वारा संचालित भोजनालयात किचनमध्ये झुरळ, उंदीर आणि घुशींनी हैदोस घातला आहे. कॅन्टीनमध्ये खड्डे पडले असून, विद्युत केबल जीवघेणी ठरत आहे. हे विदारक चित्र मुंबई येथील आयआरसीटीसी पथकाने धाडसत्र राबविताना रविवारी प्रत्यक्ष अनुभवले. त्यामुळे भोजनालय पाच दिवस सील करण्यात आले.
ठळक मुद्देआयआरसीटीसीचे धाडसत्र : रिपेअरिंगच्या नावे कॅन्टीन पाच दिवस सील