लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: दोन दिवसांपासून मेळघाटात थंडीचा जोर वाढला आहे. चिखलदरा, घटांग, माखल्यासह ठिकठिकाणी धुक्याची मलमली चादर सर्वत्र बघायला मिळत आहे. यात पाऊसही अधूनमधून आपली हजेरी लावत आहे. मेळघाटची वनराई या दाट धुक्यात हरवली आहे.पर्यटकांना १५ डिसेंबरला या दाट धुक्यातून मार्गस्थ व्हावे लागले. त्यांना आपल्या वाहनांचे दिवे लावावे लागले. काहींनी या धुक्याचा आनंद घेतला, तर काहींना या धुक्यात मार्गस्थ होताना संघर्ष करावा लागला. भरदिवसा अधूनमधून पसरणारे हे धुके मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत अधिक दाट होत असून, सकाळी उशिरापर्यंतही ते कायम राहत आहे.मेळघाटातील चिखलदरा, माखला, घटांग आणि गुगामल नॅशनल पार्कमध्ये रात्रीचे तापमान ११ अंश सेल्सीअस नोंदविले गेले आहे. पुढील तीन दिवस हे असेच तापमान कायम राहण्याची वा त्याहून कमी होण्याची शक्यता वर्तविल्या गेली आहे. चिखलदरा आणि माखला समकक्ष उंचीवर असल्यामुळे तेथील वातावरण व तापमानात साम्य आढळून येत आहे. धारणी, कोलकास व सेमाडोहचे रात्रीचे तापमान १३ डिग्री सेल्सीअसपर्यंत आले आहे.कुकरूपरतवाडा-धारणी मार्गावरील घटांगपासून अवघ्या सहा मैल अंतरावर असलेल्या कुकरू येथे रात्रीचे तापमान ९ अंश सेल्सीअस नोंदविले गेले आहे. हे थंड हवेचे ठिकाण मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील भैसदेही तालुक्यात येते. चिखलदरा आणि कुकरू हे समकक्ष उंचीवर आहे. चिखलदऱ्याप्रमाणेच कुकरू येथे कॉफीची बाग बघायला मिळते. कुकरूच्या या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.शीतलहरघटलेल्या या तापमानावर मेळघाटात सर्वत्र थंडगार वारे वाहत आहेत. जेव्हा जेव्हा देशात शीतलहर चालते तेव्हा तेव्हा त्या कडाक्याच्या थंडीत चिखलदरा, कोलकासचे तापमान ४ ते ५ अंश सेल्सीअसपर्यंत आले आहे. कुकरूचे तापमान ३ अंश सेल्सीअसने उतरले आहे.
मेळघाटावर पसरली धुक्याची मलमली चादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 7:08 PM
मेळघाटातील चिखलदरा, माखला, घटांग आणि गुगामल नॅशनल पार्कमध्ये रात्रीचे तापमान ११ अंश सेल्सीअस नोंदविले गेले आहे. पुढील तीन दिवस हे असेच तापमान कायम राहण्याची वा त्याहून कमी होण्याची शक्यता वर्तविल्या गेली आहे.
ठळक मुद्दे रात्रीचे तापमान ११ डिग्री सेल्सीअस