पारा पुन्हा घसरणार : हवामान तज्ज्ञांना अंदाजअमरावती : राज्यस्थानवर चक्राकार वारे आल्याने उत्तरेकडून विदर्भात येणारे थंड वारे कमजोर पडले आहेत. त्यामुळे गेल्या दोन ते तिन दिवसांपांसून थंडी गायब झाली होती. मात्र, पुन्हा थंडीची लाट येऊन तापमान घसरतील. पाच दिवसांपूर्वी जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढले होते. तापमान ९.५ डिग्रीपर्यंत घसरल्यामुळे गुलाबी थंडी पडली होती. थंडीच्या प्रभावाने रात्री लवकरच रस्ते ओस पडले होते. सकाळीसुध्दा थंडी अधिक जावणवल्याने अनेकांची दिनचर्या बदलली होती. मात्र, दोन ते तीन दिवसांपांसून पुन्हा थंडीचा प्रभाव कमी झाल्याने पुन्हा शहरात वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे. हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते विदर्भात येणारे थंड वारे कमजोर पडले आहेत. त्यामुळे आता ती परिस्थिती निवळली असून पुन्हा उत्तरेकडून वारे वाहण्यास अनुुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे विदर्भात थंडीचे पुनरागमन होईल. असा अंदाज बंड यांनी वर्तविला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हिा तापमान कमी होऊन १२ डिग्री सेल्सीअसपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा थंडीपासून बचाव करण्यासाठी सज्ज राहण्याची आवश्यक आहे.
थंडीचे पुनरागमन
By admin | Published: January 04, 2016 12:08 AM