ढगाळ वातावरण : दोन दिवस हवामान कोरडेअमरावती: किमान तापमानात कमी आल्याने दोन दिवसांपासून थंडी ओसरली आहे. आणखी दोन दिवस थंडी ओसरणार असून हवामान कोरडे राहील. मात्र जानेवारी महिन्याअखेरपर्यत थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे थंडीची लाट पसरली होती. परंतु आता वाऱ्यांनी दिशा बदलविल्याने किमान तापमानात कमी झाले. काहीशी थंडी ओसरली आहे. विदर्भाच्या काही भागात सरासरी तापमानात बदल झाला आहे. मात्र दोन दिवसांनी पुन्हा थंडी वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागातही तापमान वाढीस लागल्याचे हवामान खात्याने वर्तविले आहे. राज्यात बहुतांश भागाचे तापमान सरासरी जवळ पोहचले आहे. विदर्भात किमान तापमान गोंदिया येथे ११ अंश सेल्सियस नोंदविले आहे. हिमालयात अद्यापही बर्फ पडत असल्याने ढगाळ वातावरण ओसरताच पुन्हा थंडी येईल, असा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याचा परिणाम देखील थंडीवर पडणार आहे. विदर्भात थंडी ओसरत असल्याने अनेकांना हुडहुडीपासून सुटका मिळाली आहे. काही भागात अंशत: ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमान वाढ झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात रविवारी किमान १८.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले आहे. तर सोमवारी किमान तापमानात पुन्हा घट होऊन ते १५.९ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. दोन दिवस आकाश निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. २० जानेवारीनंतर पुन्हा थंडी येईल. मात्र ती कडाक्याची राहणार नाही. जानेवारीअखेरपर्यत नागरिकांना थंडीचा सामना करावा लागेल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली.ढगाळ वातावरणामुळे थंडी ओसरली आहे. दोन दिवसांनंतर पुन्हा थंडी येईल. २० जानेवारीनंतर १० अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले जाणार, अशी शक्यता आहे.- अनिल बंड, हवामान तज्ज्ञ,
थंडीचा जोर जानेवारी अखेरपर्यंत
By admin | Published: January 19, 2017 12:14 AM