शहरं
Join us  
Trending Stories
1
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
2
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
3
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
4
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
5
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
6
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
7
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
8
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
9
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
10
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
11
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
12
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
13
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
15
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
16
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
17
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
19
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
20
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 

वरुडच्या रक्तदाता संघाने केले ३ हजार २०० रक्तपिशव्यांचे संकलन !

By admin | Published: September 12, 2015 12:19 AM

गोरगरिबांना महागडे रक्त विकत घेऊन रुग्णंना देणे शक्य होत नाही. परंतु वरुड मध्ये ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार आणि सचिव चरण सोनारे ..

वाढता लोकसहभाग : आठ महिन्यात ५२ शिबिरे वरुड : गोरगरिबांना महागडे रक्त विकत घेऊन रुग्णंना देणे शक्य होत नाही. परंतु वरुड मध्ये ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार आणि सचिव चरण सोनारे यांना रक्तपुरवठा करून रुग्णांचे प्राण वाचविण्यास मोठ्या प्रमाणावर झालेला त्रास आणि गोरगरीब रुग्णांची रक्तासाठी होणारी ससेहोलपट पाहता, १ जानेवारी २०१५ ला ग्रामीण रुग्णालय संलग्नीत रक्तदाता संघ स्थापन केला. आठ महिन्यांत तब्बल ५२ रक्तदान शिबिरे आणि ३ हजार २०० रक्तपिशव्या संकलीत करण्यात आल्या. रक्तसंकलन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची रक्तपेढी तसेच नागपूरच्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे सहकार्य मिळत आहे. रुग्ण अमरावती, नागपुरला सुध्दा उपचाराकरीता दाखल असल्यास या दोन्ही रक्तपेढी अंतर्गत शासन निर्णयानुसार आणि शासनाच्या अटी व नियंमाना अधिन राहून मोफत रक्तपुरवठा करण्यात येतो. रक्तदान शिबिरे घेण्याकरिता सेवाभावी विविध संस्था, मंडळे, शासकीय कार्यालये, राजकीय पक्ष, संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य मिळत असल्याने मोठी उभारी या रक्तदाता संघाला मिळाली आहे. या माध्यमातून आयोजन करून रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्याची संकल्पना अविरत सुरू केली. परिसरातील सेवाभावी नागरिक तसेच रक्तदात्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदाता संघामार्फत रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे सुरू केले आहे. वरुड तालुक्यातून संकलित झालेले रक्त जिल्हा सामान्य रुग्णालयात देऊन मानवतेचा परिचय दिला जात आहे. तर हेच रक्त जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पुरविण्यात येऊन रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होते. या स्तृत्य उपक्रमाची अनेकांनी दखल घेऊन या कार्याला सहकार्य केले आहे.