लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : औरंगाबाद जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या जलसमाधी आंदोलनादरम्यान कानडगाव येथील काकासाहेब शिंदे या तरूण मराठ्याचा गोदावरी नदीत बुडून मृत्यूझाल्याप्रकरणी सकल मराठा जन चांगलेच आक्रमक झाले आहेत. या तरूणाच्या मृत्यूस मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य जबाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या आशयाची सामूहिक तक्रार येथील कोतवाली ठाण्यात मंगळवारी दाखल करण्यात आली.येथील राजकमल चौकात काकासाहेब शिंदे या युवकास सकल मराठा समाजाच्यावतीने सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्यानंतर याच ठिकाणी बसून काहीकाळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी कोतवाली ठाण्याकडे मोर्चा वळविला. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा देत मराठा आरक्षणास हेतुपुरस्सर विरोध करण्याच्या प्रकाराचा निषेध करण्यात आला. तसेच काकासाहेब शिंदे या युवकाच्या मृत्यूस मुख्यमंत्र्याचे व्यक्तव्यच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेविरोधात पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे सामूहिक तक्रार दाखल करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांविरुद्ध अमरावतीच्या कोतवाली ठाण्यात सामुहिक तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:10 PM
काकासाहेब शिंदे या तरूणाच्या मृत्यूस मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य जबाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या आशयाची सामूहिक तक्रार येथील कोतवाली ठाण्यात मंगळवारी दाखल करण्यात आली.
ठळक मुद्देसकल मराठा जन आक्रमक हेतुपुरस्सर वक्तव्यामुळेच युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप