जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्वप्रथम चांदूर रेल्वे शहरातील रेस्ट हाऊस लगतच्या गोडाऊनची पाहणी केली. यानंतर ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली व रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तालुक्यातील कळमगाव येथे जाऊन गावबंदीच्या स्थितीची पाहणी केली. अखेरीस घुईखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली व तेथील कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार राजेंद्र इंगळे, गटविकास विकास थोरात, मुख्याधिकारी मेघना वासनकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र कोवे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता कोवळे, ठाणेदार मगन मेहते आदींची उपस्थिती होती.
(बॉक्समध्ये घेणे)
५० बेडचे कोविड सेंटर बनणार
जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड सेंटर तयार करण्याच्या उद्देशाने चांदूर रेल्वे शहरातील रेस्ट हाऊसलगतचे गोडाऊन व घुईखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अशा दोन ठिकाणांची पाहणी केली. ठरलेल्या जागेवर ५० बेडचे ऑक्सिजन सुविधेसह कोविड सेंटर तयार होणार आहे.