शहरं
Join us  
Trending Stories
1
महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा 
2
"नव्या जोडप्यांनी 16-16 मुलं जन्माला घालावीत, कारण..."; CM चंद्रबाबूंनंतर, आता स्टॅलिन यांचंही अजब आवाहन
3
ठाकरे गटात अन् काँग्रेसमध्ये किती जागांसाठी वाद? ‘मविआ’तील नेत्याने सगळेच सांगितले
4
काँग्रेस पोटनिवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा एकटी लढण्याची शक्यता
5
मदरसे बंद करण्याची NCPCR ची शिफारस; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
6
ICU मध्ये प्रवेश न दिल्याने भाजपा आमदाराच्या भावाची दादागिरी; कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण
7
परी म्हणू की सुंदरा... तिच्या जबरदस्त खेळाने प्रतिस्पर्धी, तर सौंदर्याने चाहते घायाळ
8
“कोणताही विभाग हा एका पक्षाचा नसतो”; ठाकरे गट-काँग्रेस वादावर संजय राऊत स्पष्टच बोलले
9
करन जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'ला मिळणार अदर पूनावालांचा 'बूस्टर', विकत घेणार अर्धा हिस्सा
10
मी मरता मरता वाचलो! मराठी अभिनेत्याने सांगितला घोडबंदर रस्त्यावरील जीवघेणा प्रसंग, राजकारण्यांना लगावला टोला
11
बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?
12
मोदी सरकारमध्ये शिवराजसिंह चौहान यांचं वजन वाढलं! पंतप्रधान मोदींनी दिली मोठी जबाबदारी
13
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
14
'या' हिरो बाईकने विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले; ही नावे आहेत टॉप-5 मध्ये...
15
दिवाळीपूर्वी NTPC च्या शेअरधारकांसाठी मोठं गिफ्ट! कंपनी देणार Dividend, रेकॉर्ड डेट काय?
16
३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य
17
‘गण गण गणात बोते’चा नेमका अर्थ काय? गजानन महाराजांनी मंत्र का दिला? अखंड जपाने मिळेल पुण्य
18
मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा
19
आखाती देशांमध्ये १३ हजार लोकांचे नेटवर्क, हवालाद्वारे निधी... पीएफआय संदर्भात ईडीचा मोठा खुलासा
20
धक्कादायक! कोट, स्टेथोस्कोप... महिलेला डॉक्टर होण्याचे 'वेड'; डिग्रीशिवाय करत होती उपचार

कलेक्ट्रेट, एक्साइजमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 10:47 PM

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येवती येथील चोरटी दारूविक्री व वरली मटक्याचे अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे, या मागणीसाठी महिला व नागरिकांनी मंगळवारी उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा कचेरीवर धडक दिली.

ठळक मुद्देयेवती येथील महिलाशक्ती आक्रमक : अवैध दारू, जुगार बंद करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतअमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येवती येथील चोरटी दारूविक्री व वरली मटक्याचे अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे, या मागणीसाठी महिला व नागरिकांनी मंगळवारी उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा कचेरीवर धडक दिली. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मोरोटकर व सरपंच गोकुळ राठोड यांच्या नेतृत्वात ठिय्या दिला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर व उत्पादन शुल्क अधीक्षक प्रमोद सोनोने यांना निवेदन देण्यात आले.येवती येथून इतरही गावांना दारूचा पुरवठायेवती येथे काही वर्षांपासून १० ते १२ जण अवैध गावठी व देशी दारूचा व्यवसाय राजरोसपणे करीत आहेत. याशिवाय वरली मटकाही सुरू आहे. या अवैध धंद्यांमुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस अवैध व्यवसाय वाढल्यामुळे महिला, मुली, वृद्ध यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. दारू गावातच मिळत असल्याने तरुणाई या व्यसनाच्या आहारी जात आहेत. अवैध व्यवसाय करणाºयांची दादागिरी वाढली असून, परिसरातील इतर गावांतही दारूचा पुरवठा होत आहे.या अवैध व्यवसायामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, येवती येथील सर्व अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी आंदोलकांनी जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क अधीक्षक व पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली. अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यामध्ये युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर, सरपंच गोकुळ राठोड, भावेश भांबूरकर, आशिष भाकरे, सुजाता कुलुके, बेबी चिखांडे, रेखा रामटेके, ललिता चेंडकापुरे, नलू इंगळे, शारदा भाकरे, रूपाली घोडेस्वार, ज्योती नाईक, देवका बनारसे, सीता सुलताने, संजय मेश्राम, संघपाल ढोके, मनोज खोब्रागडे, रमेश राऊत, प्रशांत चव्हाण, जयप्रकाश खडसे व ग्रामस्थांचा समावेश होता.अधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आदेशयुवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी उत्पादन शुल्क व पोलीस अधीक्षकांना कारवाईच्या सूचना दिल्यात. याची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी नांदगाव खंडेश्वर ठाणेदाराला धाडी टाकून कारवाईचे आदेश दिले आहेत. याशिवाय उत्पादन शुल्क विभागानेही कारवाईचे आश्वासन दिले आहे.