लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतात व पांदण रस्त्यावर लोंबकळलेल्या व तुटलेल्या जिवंत वीजतारांमुळे अलीकडे आठ बैलदगावले आहेत. त्यामुळे ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त बैलजोडी मालकांना शंभर टक्के नुकसानभरपाई आणि दोषी अभियंता, कंत्राटदारांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी मंगळवारी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी बैलजोडीसह कॅम्प स्थित महावितरणच्या ‘प्रकाश भवन’वर धडक दिली. यावेळी अधीक्षक अभियंत्यांना निवेदनातून न्याय देण्याची मागणी करण्यात आली.महावितरणच्या गैरकारभारामुळे ग्रामीण भागात विद्युत पुरवठा करणारे खांब वाकल्याने वीजवाहक तारा झुकल्या आहेत. ट्रान्सफॉर्मर उघडे पडले आहे. शेत रस्ते, पांदण रस्त्याच्या कडेने जाणाºया तारा जमिनीला टेकल्या आहेत. शेतात कृषिपंपाचे संबंधित कंत्राटदारांनी पोल अत्यंत थातूरमातूर उभे केले. परिणामी कित्येक ठिकाणी जिवंत तारा तुटण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत शेती व शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात लखाड व पूर्णानगर येथे पेरणीच्या हंगामात शेतकºयांच्या बैलजोडीचा मूत्यू जिवंत तारांच्या स्पर्शाने झाला आहे. या सर्व प्रकाराला महावितरण कंपनीच जबाबदार आहे. त्यामुळे या घटनांना जबाबदार अधिकाºयावर कारवाई करण्यात यावी, नुकसानग्रस्त बैलमालकांना शंभर टक्के भरपाई देण्यात यावी, लोंबकलेल्या, तुटलेल्या जिवंत वीजवाहिन्या तसेच उघड्या डीबीची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी काँग्रेसने अधीक्षक अभियंत्यांना केली.संप्तत शेतकºयांनी अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या हातात बैलजोड्यांचे दोर सोपविले आणि आता तुम्हीच त्यांचे पालनपोषण करा, असे म्हणाले. आंदोलनात शेखर अवघड, शशिकांत बोंडे, अनिकेत ढेंगळे, समीर जवंजाळ, गणेश कडू, उमेश महिंगे, गौतम दाभाडे, सुनील अग्रवाल, सुधीर बोबडे, वहीद काजी उपस्थित होते.तारा तुटल्याने शेती पडीकगोपाळपूर सालोरा येथे महावितरणच्या गलथान कारभारामुळे किटुकले नामक शेतकºयाची दोन एकर शेती पडीक आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही वीजतारांची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे न्याय कुणाला मागायचा, असा प्रश्न आमला सालोरा येथील महेश दिवाण यांनी अधीक्षक अभियंत्यांना केला.
महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांची बैलजोडीसह धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 1:25 AM
महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतात व पांदण रस्त्यावर लोंबकळलेल्या व तुटलेल्या जिवंत वीजतारांमुळे अलीकडे आठ बैलदगावले आहेत. त्यामुळे ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
ठळक मुद्देकाँग्रेसचे आंदोलन : बैलमालकांना भरपाई देण्याची मागणी