शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

रानमाळावर 'फ्लेम ऑफ द फायर'चा रंगोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 4:50 PM

वसंत ऋतुची चाहूल लागताच डोळ्याला भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला आहे. रानमाळावर जणू आतापासूनच रंगोत्सवाला सुरुवात झाली आहे.

- अमित कांडलकर

गुरुकुंज(मोझरी) (अमरावती) : वसंत ऋतुची चाहूल लागताच डोळ्याला भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला आहे. रानमाळावर जणू आतापासूनच रंगोत्सवाला सुरुवात झाली आहे.'फ्लेम ऑफ द फायर' असे पळसफुलांचे नामकरण इंग्रजांनी केले आहे. तो सध्या संपूर्ण रानमाळावर बहरला असून, होळीनिमित्त त्याच्यापासून तयार रंगाची उधळण केली जाते. शिषिर ऋतूमधील हवेतला गारवा जाऊन पानगळीने उघडे पडलेली वनसंपदा पळस फुलाच्या सौंदयाने रंगउधळण करतांना लक्ष वेधून घेते.संस्कृतीमध्ये पळस फुलांना पलाश म्हणतात. याचा अर्थच फुलांनी डवरलेले झाड, असा होतो. पळसाची फुले सरस्वती माता आणि कालिमातेला भक्तिभावाने अर्पण करण्याची पद्धती आहे. त्याच्या नावावरच 'कुठेही गेला तरी पळसाला पाने तीनच' अशी म्हण प्रचलित आहे. तोच पळस बहुगुणी असून, त्याच्या फुलांचा उपयोग होळीमध्ये रंग बनविण्यासाठी होतो. पानांचा उपयोग द्रोण, पत्रावळी बनविण्यासाठी केला जातो. पळस हा खडकाळ भागात अथवा शेताच्या धु-यावर वाकड्या स्थितीत आढळतो. त्याची उंची मध्यम असते. झाडाची संपूर्ण पाने गळून गेल्यानंतर पळसाच्या झाडाला फुलांचे घुमारे फुटतात. सद्यस्थितीत निसर्गामध्ये केशरी, भगवा आणि पिवळ्या रंगाची फुले आढळून येत आहेत. त्याची अनेक औषधी गुणधर्म असून, त्याच्यापासून तयार केलेल्या पाण्यात आंघोळ केल्यास अनेक त्वचारोग नाहीसे होतात. तसेच त्याच्या बियांचा आयुर्वेदिक औषधीमध्ये उपयोग होतो, असे आयुर्वेदात नमूद आहे.

पळस पानांचा पुन्हा भाग्योदय निश्चित..! पळसाच्या पानाचा आकार मोठा असल्याने त्यापासून उत्तम पत्रावळी तयार करता येते. त्यावर केलेले अन्नग्रहण शरीरास उपयुक्त ठरते. तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथे या पळसाच्या पानापासून पत्रावळी बनविणारा मोठा कारागीर वर्ग आहे. याचा वापर वाढवावा, जणेकरून थर्मोकोल, प्लास्टिक कोटींगच्या जीवघेण्या पत्रावळी बाद होतील. थर्मोकोल,  प्लास्टिक कोटींगच्या पत्रावळीमुळे कॅन्सरसारखा असाध्य आजार होऊ शकतो, असे इयत्ता आठवीच्या विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमात नमूद आहे. थर्मोकोलच्या वस्तूत गरम अन्न ग्रहण केल्यास त्यातील 'स्टायरीन' नामक विष अन्नात मिक्स होऊन अपाय होण्याची शक्यता असते.

थर्माेकोलच्या वस्तूत गरम अन्न ग्रहण केल्यामुळे पालीस्टायरीन निर्माण होते. ते अन्न पचविण्यास जड जाते. त्यामुळे किडनीचे आजार होतात.- प्रा. सचिन आगीवाल, आयुर्वेदिक महाविद्यालय

टॅग्स :Amravatiअमरावती