अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : मेळघाटात दुर्मीळ रंगीत बेडूक आढळले आहेत. ‘पेंटेड कलुओला’ असे त्यांचे शास्त्रीय नाव आहे. ते थंड हवामानाच्या अधिवासात आढळतात. मेळघाटातील चिखलदऱ्याकडील जंगलात यांची प्रथमच नोंद घेण्यात आली आहे. बेडकांच्या १६ प्र्रजातींच्या नोंदीमुळे मेळघाटातील संपन्न जैवविविधता पुन्हा एकदा आधोरेखित झाली आहे.
परतवाडा आणि अंजनगाव सुर्जी भागात याआधी हे बेडूक आढळले तरी ते मेळघाटामधील लाकडांसोबत, लाकडाच्या ढोलीतून तेथे आल्याचा दावा संशोधक तथा अमरावती स्थित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक गजानन वाघ यांनी केला.