---------------
अंजनसिंगी-कु-हा रोडवरील वाहतूक ठप्प
अंजनसिंगी : यवतमाळ ते रिद्धपूर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे सध्या अंजनसिंगी ते कु-हा पर्यंत काम चालू आहे. काम करणाऱ्या कंत्राटदाराने संपूर्ण रस्ता खोदून त्यात काळी माती टाकली आहे. का संध्याकाळी आलेल्या पावसामुळे रोडवर गारा होऊन वाहतूक ठप्प झालेली आहे काही वाहने त्यामध्ये फसलेली आहे. सदर रोडचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग तिवसा यांच्या अधिकारात येत असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. वाहनधारकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. काल झालेल्या पावसामुळे अनेक दुचाकी वाहनधारकांची वाहने या ठिकाणी मातीत फसली. तेथेच वाहन सोडून परत जावे लागले. मात्र, याकडे काम करणाऱ्या कंत्राटदाराने लक्ष दिले नाही. तसेच पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वळण रस्त्यावर कुठलीही सूचना नसल्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची बघ्याची भूमिका आहे. त्यामुळे या भागातील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून रोडवरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचा व जनतेच्या समस्या जाणून घेऊन काम करणाऱ्या कंत्राटदाराला योग्य काम करण्याची तसेच रस्त्यावर मातीऐवजी मुरूम, गिट्टी टाकून ताबडतोब दबाई करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी वाहनधारकांनी आणि जनतेने केली आहे.
---------------
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी वाचनालय स्थापन
शिंदी बु : अचलपूर तालुक्यांतर्गत ग्राम शिंदी आणि पोही या गावी समाजकल्याण विभाग जि.प.च्या योजनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी वाचनालयाचे उद्घाटन करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय शिंदी बु येथील वाचनालयाचे उदघाट्न तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष राहुल गाठे यांच्या हस्ते तर पोही येथील वाचनालयाचे उद्घाटन सरपंच रजनीताई गजभिये यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला माजी सभापती देवेंद्र पेटकर, माजी उपसभापती राजेंद्र पवार, अरुण सारडे, विनोद बदरके, ग्रा.प.उपारपंच मो. शहजाद, सदस्य शेख इस्माईल शेख बहाद्दर, रोशन कविटकर, वैभव रोही, अश्विनीताई पेटकर, माजी सदस्य राजकन्याबाई गाठे, पृथ्वीराज गजभिये, देवानंद गजभिये उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजेश सूर्यवंशी व राजू गाठे यांनी केले. कार्यक्रमासाठी विनीत वानखडे, विशाल गाठे, उमेश दांडगे, नागेश वानखडे, विशाल गाठे, प्रवीण दाभाडे, धम्मवीर वानखडे, नंदू तायडे, विजेंद्र धांडे, मंगेश गाठे, बुद्धभूषण गाठे, सुशील वानखडे, महेंद्र गाठे, सागर गाठे, सिद्धार्थ गाठे, सचिन गाठे, विकास तेलगोटे, अशोक गाठे, भावेश बदरके, कैलास गाठे, बळवंत गाठे, प्रदीप गाठे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सर्व बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.
बॉक्स
पुस्तके वाटपाचे आश्वासन
पथ्रोटचे ठाणेदार सचिन जाधव यांनी वाचनालयाला भेट देत स्पर्धा परीक्षेविषयी उपस्थित युवकास मार्गदर्शन केले आणि पुस्तक भेट देणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच कोरोना नियमाचे पालन करण्याचेही निर्देश दिले.
-----------
स्कूलबस मालकावर उपासमारीची वेळ
आर्थिक विवंचनेतून कोंडी; अनेकांनी बदलला व्यवसाय
चांदूर बाजार : गेल्या १४ महिन्यांपासून स्कूल बंद असल्यामुळे निगडित व्यवसाय ठप्प झाले आहे. या ठप्प पडलेल्या व्यवसायाचा सर्वाधिक फटका स्कूल बसचालक - मालकांना बसला आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
२२ मार्च २०२० पासून देशात कोरोना महामारीचे संकट घोंगवेत होते. अशात शासनाने लॉकडाऊन जाहीर करून सर्वच व्यवसाय बंद केले होते. अशात शाळा, महाविद्यालय सुद्धा एक वर्षांपेक्षा जास्त काळ पासून बंद पडले आहे. या शाळा बंद असल्याने शाळेवर आधारित अनेक व्यवसाय सुद्धा ठप्प झाले आहे. अशातच शाळेवर आधारित स्कूल बस सेवा सुद्धा आहे. त्याचा मोठा फटका स्कुल बसचालक मालकांना बसला आहे. गेल्या एका वर्षभरापासून पूर्वस्थिती जाग्यावरच आली नसल्याने स्कूल बस मालक-चालक यांची दूरअवस्था झाली असून या आर्थिक अडचणीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
गेल्या एक वर्षापासून सर्वत्र शाळा बंद आहेत. तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळा मोठ्या प्रमाणात असून या शाळांमधील बाहेर गावातील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी तालुक्यात साधारणपणे ४५ ते ५० स्कूल बसेस आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सर्व शाळांचा अभ्यासक्रम शाळेतून बंद झाला असून केवळ ऑनलाइन सुरू आहे. पण या शाळेतील स्कूलबस मात्र, गेल्या एक वर्षापासून जागेवरच थांबलेले आहे. यामुळे बस मालक व चालक दोघांचे आर्थिक उत्पन्न बंद आहे.
अनेकांनी बस फायनान्सवर घेतलेले आहे. यामुळे स्कूल बससेवा बंद असली तरी दर महिन्याला कर्जाचा हप्ता मात्र भरावाच लागतो. आपले वाहन फायनान्स कंपनीने ओढून घेऊन जाऊ नये, यासाठी काही बसमालक खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन ईएमआय भरत आहे. अनेकांनी जवळील मौल्यवान वस्तू गहाण ठेवून कर्जाचे हप्ते भरले आहेत. अशात एक छदामही उत्पन्न नसताना कर्ज फेडण्यासाठी आणखी कर्जाचा डोंगर बस मालकावर होत आहे.
यावर्षीदेखील पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढला असताना पुन्हा एकदा राज्य शासनाने मिनी लोकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे शाळा सुरू होण्याची आशा संपुष्टात आली आहे. यामुळे अनेक स्कूल बस चालक मालक आपला व्यवसाय बदलून तसेच आपली वाहने कवडीमोल भावात विकून अन्य व्यवसायाकडे वळू लागले आहे. लाखो रुपये खर्च करून खरीदी केलेल्या स्कूल बसेस या आता पांढरा हत्ती ठरू लागल्या आहे.
( फोटो ई-मेल केला आहे)
------------------
तरुणांमध्ये वाढतेय डोळ्यांचे आजार
स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणकाचा अतिवापर घातक
चांदूर बाजार : अश्रू म्हणजे आपल्या भावनांचा प्रतीक आहे. आपण कधी दुखावले गेलो तर डोळ्यात टचकन अश्रू बाहेर पडतात. कधी अत्यानंद झाला की, आनंदाश्रू येतात. पण जर तुमच्या डोळ्यातून अश्रू येत नसतील तर तो एक आजार आहे. अश्रू न येणे म्हणजे डोळे कोरडे होण्याच्या समस्येत वाढ होत आहे. यालाच ड्राय आय सिंड्रोम म्हणतात. हा आजार युवकांमध्ये आता वाढत चालला आहे.
लॅपटॉप संगणकाच्या अतिवापरामुळे हा आजार बळावत आहे. खासगी रुग्णालयात दररोज येणाऱ्या रुग्णांत दोन ते तीन टक्के रुग्ण हे डोळे कोरडे होण्याच्या समस्येवर उपचारासाठी येत असल्याची माहिती आहे. वयोमानानुसार दृष्टी कमकुवत होते, म्हणून वृद्धांमध्ये हा आजार दिसून येतो. याशिवाय मधुमेह, रक्तदाब, रक्त पातळ करण्याचे औषध घेणाऱ्या रुग्णांमध्ये ही ड्राय आय सिंड्रोमचा धोका असतो. परंतु आता सर्वच वयोगटातील विशेषतः तरुणांत ही समस्या प्रकर्षाने समोर येत असल्याचे चित्र प्रमुख डॉक्टरांकडून सांगितले जाते.
डोळे कोरडे होण्याचे मुख्य कारण म्हणजे पापण्याही लावू न देता सतत संगणक व स्मार्टफोन स्क्रीनकडे एक टक पाहत या क्रियेत पापण्या लावणेच होत नाही. संगणकाचा वापर करताना मिनिटाला १० ते १५ वेळा पापण्या बंद सुरू करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. दुसरे म्हणजे जास्तीत जास्त वेळ वातानुकूलित खोलीत घालवणे एक कारण आहे. यामुळे डोळ्यात पाणी थांबत नाही. सतत वाहत असतात. त्यामुळे डोळे कोरडे पडतात. ही आजाराची लक्षणे आहेत. शासकीय नोकऱ्यांमध्ये अनेकांना संगणकावर डोळे लावून बसावे लागते. असे लोक डोळ्यांच्या समस्येने त्रस्त असतात.
डोळे कोरडे होण्याच्या काही कारणांमधील स्वयंम प्रतिकार रोग तसेच अँटी स्टॅमिना आणि अँटी प्रेझेंट गोळ्यांचा वापर या गोष्टी कारणीभूत असतात. कोरड्या व वादळी हवामानामुळेही डोळे कोरडे होतात. कॉन्टॅक्ट लेन्सेस आणि डोळ्यांचा मेकअप सुद्धा यासाठी कारणीभूत आहे. सकाळी उठल्यावर डोळ्यात जळजळ होणे हे मुख्य लक्षण आहे. याशिवाय खाज येणे, कधीकधी अंधुक दिसणे, डोळ्यातून पाणी बाहेर येणे, डोळे कोरडे होण्याच्या समस्येला हा प्रतिसाद असतो. अधिक गंभीर प्रकारांमध्ये कोरड्या डोळ्यांच्या पृष्ठभागावर उघड्या नसांवर सूक्ष्म कणनिर्मित होऊन डोळ्यात एकदम खूपल्यासारखे वेदना होऊ शकतात.
बाहेरून फिरून आले की, डोळे लाल होणे आणि नंतर आपोआप बरे होणे हा या आजाराचा माइल्ड प्रकार आहे. ड्राय-आय सिंड्रोमची ही स्टेज जी अनेकांमध्ये दिसते. असे नेत्र तज्ञांकडून सांगितले जाते. यात मुख्य म्हणजे बदललेली जीवनशैली व तंत्रज्ञानामुळे डोळे कोरडे होण्याचा आजार वाढलेला आहे. संगणकाच्या अति वापराचा प्रमाण अश्रुग्रंथीवर होतो. यात कमी वयात मोतीबिंदू होणे, नजर कमी होणे आदी समस्या उद्भवू शकतात. रुग्णालयात दिवसातून किमान पाच ते सहा रुग्ण ड्राय आय सिंड्रोमचे असतात. या गंभीर प्रकारच्या रोगासाठी विशिष्ट उपचार पद्धती आवश्यक असते. असे नेत्ररोग प्रमुखाकडून सांगितले जात आहे.
--------------
कु-ह्याच्या पंचशील काँलनीत डॉ.आंबेडकर जयंती
कु-हा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून कु-हा ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना सुनीलबाबा नायर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
येथील पंचशील काॅलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील कार्यक्रम सकाळी ११ वा. कु-हा ग्रामपंचाय सदस्य बाबाराव राऊत यांच्या अध्यक्षतेत व प्रमुख अतिथी म्हणून सरपंच मीना सुनीलबाबा नायर, शरदराव पवार, नरेश वाडी, कैलास कु-हेकर, कल्याण बेहरे, ग्रा.पं.सदस्य सुरेंद्र दोंदलकर, वासुदेव राऊत, सतीश इंगोले, अनुग्रह नायर, दादाराव इंगळे, राजू लिल्हर्वे, श्रीकृष्ण राऊत, किसनराव आठवले, पुंडलिक काबंळे व भीमसैनिकांच्या उपस्थित घेण्यात आला. सदर कार्यक्रम कोविड-१९ संक्रमण वाढल्यामुळे साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका, मदनीस प्रामुख्याने उपस्थित होत्या.
--------------
समता सैनिक दल, बडनेरा युनिटद्वारा डॉ. आंबेडकर जयंती
बडनेरा : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बडनेरा बसस्थानकासमोर ध्वजारोहण करून पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक, सिनेअभनेते, रिपब्लिकन पँथरचे प्रमुख विरासाथीदार यांचे कोरोनामुळे अकस्मात निधन झाले. त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन बडनेरा युनिटचे संघटक मार्शल निशांत वासनिक यांनी व ध्वजारोहण समता सैनिक दलाचे मार्गदर्शक प्रशांत लांजेवार यांनी व आभार प्रदर्शन जगदीश रोकडे यांनी केले. कार्यक्रमात निमंत्रक सुरेन्द्र टेंभूर्णे, प्रकाश खोब्रागडे, दुर्योधन लोणारे, सुरेश बनसोड, शेखर रामटेके, संजय धीमन, सुनील टेंभुर्णे, धर्मपाल डोंगरे, घोडेस्वार, ईश्वर मेश्राम, मार्शल मयूर, मार्शल गौतमआदी उपासक उपासिका उपस्थित होते.
--------------