अमरावती : जिल्ह्यात बुधवारी ६,२६२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात २.१३ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद झाली. यंदाची ही सर्वात कमी पॉझिटिव्हिटी नोंद झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला. संसर्गात कमी आल्याने लवकरच जिल्हा अनलॉक होणार असल्याचे संकेत आहेत.
मे महिन्यात संसर्गाचा आलेख चांगलाच माघारला आहे. या आठवड्यात चाचण्या वाढल्या असल्या तरी संक्रमितांची नोंद कमी झालेली आहे. हे चित्र दिलासाजनक आहे. यामुळे दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी असे चित्र येत्या आठवड्यात राहण्याची शक्यता आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार मे महिन्यातील नऊ दिवसांत २,१३८ संक्रमितांचे नोंद झाली तर ३,९५९ नागरिक संक्रमनमुक्त झाले आहे. सर्व प्रकारचे कोरोना हॉस्पिटल आता ओस पडले आहेत. या रुग्णालयांमधील आयसीयू, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन बेड रिक्त आहेत, हे चित्र दिलासाजनक आहे. याऊलट बाजारात चिक्कार गर्दी आहे. जिल्ह्याचे अर्तचक्र गतिमान होत असतांना त्रिसूत्रीसह कोरोना नियमांचे पालन होणे अत्यावश्यक आहे.
बॉक्स
बुधवारी १३४ पाॅझिटिव्ह अन् एक मृत्यू
जिल्ह्यात बुधवारी नव्या १३६ रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ९४,६२४ वर पोहोचली आहे. याशिवाय जिल्ह्यात पापळ वाढोणा येतील ६५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १,५१२ झालेली आहे. याशिवाय अकोला जिल्ह्यातील अकोट येथील ५२ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद आहे.