विकासकामांच्या पाहणीकरिता २१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रिद्धपूर येथे भेट दिली होती. यावेळी मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत सुरू असलेले पाईप लाईनचे कामबंद पडले होते. ते काम तातडूने पूर्ण करण्यात यावे व नागरिकांना लवकरात लवकर पाणी उपलब्ध करावे, अशी सूचना संबंधित कंत्राटदाराला देण्यात आली.
सरपंच गोपाल जामठे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, उपसरपंच साबीर, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जावरकर, सचिन डवके, पंकज हरणे, राजेन्द्र वाईनदेशकर, प्रमोद हरणे यांनी रिद्धपूर ते जालनापूर रस्त्यावरील कोसलेला पूल व संरक्षणभिंत बांधण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या कामालादेखील सुरुवात झाली आहे. रिद्धपूर ते मोर्शी राज्य महामार्गावर रिद्धपूर येथे लावण्यात आलेले पथदिवे सुरू करण्यात आले आहेत. यामुळे रिद्धपूर येथील बस्थानक परिसरातील अंधार नाहीसा झाला आहे.