रस्त्याची पाहणी : तत्कालीन शहर अभियंत्यासह सहा जणांवर गंडांतरअमरावती : ज्या अधिकाऱ्यांनी महापालिकेचे आर्थिक नुकसान केले अथवा जनतेच्या कराची लूट चालविली असेल अशांना अगोदर सस्पेंडनंतर जेलमध्ये पाठविले जाईल, असा सूचक इशारा नव्या आयुक्तांनी दिल्याने अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शुक्रवार येथील गोपालनगर ते एमआयडीसी दरम्यान सुरु असलेल्या रस्त्याची पाहणी करताना यात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्या जात असल्याने प्रचंड नाराजी व्यक्त करीत महापालिका बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत प्राप्त निधीतून हा रस्ता निर्माण केला जात आहे. सी.एल. खत्री यांनी नामक कंत्राटदारांनी हा रस्ता निर्माण करण्याची जबाबदारी घेतली आहे. मागील काही महिन्यांपासून हा रस्ता निर्माण करण्याचे काम सुरु असताना अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याची तक्रार चक्क महापौर रिना नंदा यांनी केली होती. मात्र, त्यावेळी प्रशासनाने फार दखल घेतली नाही. अखेर नवे आयुक्त गुडेवार यांनी रस्ते निर्मितीच्या कामाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. याच श्रृंखलेत शुक्रवारी या रस्त्याची पाहणी करताना अभियंत्यांनी जे काही बदमाशी केली, त्यावर आयुक्त जाम उखडले. गुडेवार यांनी काही अभियंत्यांना शिव्या देखील दिल्याची माहिती आहे. प्रकाश विभागाच्या कामकाजावर प्रचंड नाराजी व्यक्त करीत काहींना घरी पाठवेल, अशी तंबी देखील दिली. अगोदर कारणे दाखवा, निलंबन त्यानंतर जेलमध्ये पाठविले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी उपायुक्त विनायक औगड, ज्ञानेद्र मेश्राम, प्रकाश देशमुख, नरेंद्र तिखिले, बंसेले, भूषण पुसदकर आदी उपस्थित होते. आता सफाईची कामे ‘झिरो बजेट कॉम्फ्रमाईज’शहरात दैनंदिन साफसफाई ही कंत्राटपध्दतीने सुरू आहे. शुक्रवारी ४३ प्रभागातील सफाई कंत्राटदारांची बैठक घेवून त्यांना चांगल्या दर्जाची साफसफाई करण्याच्या सूचना दिल्यात. थकीत देयके दिली जाईल, मात्र करारानुसार सफाई कर्मचारी नसेल तर विचार केला जाईल. आता ‘झिरो बजेट कॉम्फ्रमाईज’ यानुसारच कामे होतील, असे चंद्रकांत गुडेवार म्हणाले.
आयुक्त म्हणाले, ‘सस्पेंड’नंतर ‘जेल’!
By admin | Published: April 17, 2015 11:57 PM