शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

उमेदवारांच्या बँक खात्यावर आयोगाची नजर

By admin | Published: November 16, 2016 12:29 AM

केंद्र सरकारने चलनात असलेल्या पाचशे, हजार रूपयांच्या नोटा बाद केल्यानंतर नग़र पालिकेच्या ...

प्रत्येकांच्या खात्याची माहिती घेणार : कॉर्नर सभांना सुरुवात, पाचशे व हजाराच्या नोटांची अडचणधामणगाव रेल्वे : केंद्र सरकारने चलनात असलेल्या पाचशे, हजार रूपयांच्या नोटा बाद केल्यानंतर नग़र पालिकेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या बँक खात्यावर निवडणूक आयोगाने करडी नजर ठेवली आहे़ पाचशे, हजारांच्या नोटा बदलविणे महागात पडणार आहे़ दरम्यान प्रत्येक खात्याची माहिती घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहे़जिल्ह्यात नगरपरिषद निवडणूकीचे रणधुमाळीला गती आली आहे़ सर्वच राजकीय पक्षांच्या नगराध्यक्ष व ऩप़सदस्य पदाकरिता रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचाराचे नारळ फुटले आहे़ एकीकडे कॉर्नर सभेला सुरूवात झाली आहे, तर दुसरीकडे उमेदवारांच्या मागे आता शंभरीचा तगादा काही मतदारांनी लावला आहे़ आपल्याकडे चिल्लर नसल्याची शक्कल काही उमेदवार लढवित असले तरी मोजके मतदार पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यासाठी मागेपुढे पाहत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ (तालुका प्रतिनिधी)बँक खात्यांची होणार चौकशीनगरपरिषद निवडणुकीत नामांकन दाखल करताना सर्वच उमेदवारांना आपली संपत्ती नमूद या नामांकनात करावी लागली आहे़ जे बँकेचे खाते दिले आहेत आणि त्यात असलेल्या रक्कमेचा आकडा दिला आहे़, यामध्ये काही बदल होतेय का यासाठी निवडणूक आयोगाने बँक खात्याकडे बारीक लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकाची निर्मिती केली आहे़ संबंधित उमेदवारांच्या खात्यात अचानकपणे पाचशे, हजार रूपयांच्या अडीच लाख रुपयांपर्यंत नोटांची रक्कम जमा झाली असेल अशा खात्याची चौकशी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले आहेत़दररोज निवडणुकीचा खर्च उमेदवारांना सादर करणे बंधनकारक आहे़ नामांकन दाखल करताना दिलेल्या बँकांच्या खात्यात अवाजवी रक्कम संबंधित उमेदवार जमा करीत असेल, अशा खात्याची चौकशी निवडणूक विभागाच्यावतीने होणार आहे़- नरेंद्र फुलझेले,निवडणूक निर्णय अधिकारी, नगरपरिषद