लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावरच बोगस बियाणे बाजारपेठेत आल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय ११ जून रोजी जिल्हा परिषदेच्या आमसभेत घेण्यात आला. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी पाच सदस्यीय समिती निश्चित केली आहे. त्यानुसार लवकरच ही चौकशी समितीचे काम सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष गोंडाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जिल्हाभरात खरीप हंगामाची लगबग जोरात सुरू झाली आहे. अशातच बोगस बियाण्याचा शिरकार बाजारपेठेत झाल्याची बाब ११ जून रोजी जिल्हा परिषदेच्या आमसभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य देवेंद्र भुयार यांनी उघडकीस आणली. त्यामुळे या गंभीर बाबीची जिल्हा परिषद अध्यक्षांनी दखल घेतली आहे. जिल्ह्यात राजा, जादूगर नामक कंपनीचे बोगस बियाणे बाजारपेठेत दाखल झाल्याचा प्रकार पुराव्यानिशी झेडपीच्या आमसभेत सदस्य देवेंद्र भुयार यांनी उघडकीस आणताचा कृषी विभागात एकच खळबळ उडाली .दरम्यान, बोगस बियाण्याची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेने चौकशी समिती नेमली आहे. यामध्ये चौकशी समितीचे प्रमुख परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे आहेत. याशिवाय समितीत उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सदस्य प्रकाश साबळे, बाळासाहेब हिंगणीकर, प्रताप अभ्यंकर, अभिजित बोके आदीसह महिला व बालकल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ प्रशांत थोरात आदीचा समावेश असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. ही समिती लवकरच चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या सभागृहात ठेवणार आहे. त्यानंतर यावर कारवाईची दिशा ठरविली जाणार असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.
समिती गठित; बोगस बियाण्यांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 11:47 PM
जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावरच बोगस बियाणे बाजारपेठेत आल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय ११ जून रोजी जिल्हा परिषदेच्या आमसभेत घेण्यात आला. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी पाच सदस्यीय समिती निश्चित केली आहे. त्यानुसार लवकरच ही चौकशी समितीचे काम सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष गोंडाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
ठळक मुद्देअध्यक्षांनी केली निवड : सभागृहासमोर ठेवणार अहवाल