वायएसपीची मागणी; आ.रवी राणा यांचे नेतुत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती : जिल्ह्यात सतत अतिवृषटीमुळे व पावसाने शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने अनेक पिके करपली. जमीन खरडून गेली. घरांची पडझड झाली. गुरेही वाहून गेलेत. त्यामुळे या सर्व नुकसानाचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी गुरुवारी युवा स्वाभिमानच्यावतीने आमदार रवि राणा यांच्या नेतृत्वात शेतकरी व कार्यकर्त्यांनी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना देण्यात आले आहे.
गत काही दिवसांपासून अमरावती, भातकुली तालुक्यासह जिल्हाभरात पावसामुळे शेती पिकांचे, घराची पडझड आणि गुरेढोरेही वाहून गेली आहेत.याचा फटका शेतकरी व नागरिकांना बसला आहे.अनेक गावे जलमय झाले आहेत.या नुकसानामुळे अनेकांची कुटुंब उघड्यावर आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून सरकट ३० हजार रूपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी. पुरात वाहून गेलेल्या कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या केलेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या कुटुंबांना शासनाने १० लाख रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी युवा स्वाभिमानने केली. यावेळी जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, ज्याेती सैरीसे, मयुरी कावरे, दिनेश टेकाम, उमेश ढोणे, मीनल डकरे, रश्मी घुले, जया तेलखडे, प्रदीप थोरात, राजू रोडगे, मंगेश पाटील उपस्थित होते.