अमरावती : राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक पीकं पाण्याखाली गेले, शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे केली.
विदर्भ, मराठवाड्यात सततच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. सोयाबीनला कोंब फुटले, कापसाची बोंडे सडली, तुरीचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयात केल्याने सोयाबीनला फक्त चार ते पाच हजाराचा भाव मिळत आहे. केंद्र सरकारने फसल बीमा योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नवनीत राणा यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर सिंह यांची भेट घेऊन केली.
दरम्यान अतिवृष्टीमुळे विदर्क्ष मराठवाड्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून आता करावे तरी काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थिती त्यांना मदतीचा हात म्हणून सरकारने तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे.