लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेमार्फत सन २०१८-१९ मधील जिल्हा निधीतून सुमारे १ कोटी ०८ लाख ७६ हजारांच्या रकमेतून ४२ कामे मंजूर केली होती. सदर कामांचे वाटप करण्यासाठी मंगळवार २३ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सुशिक्षित बेरोजगार अभियंता (सुबेअ) यांना कामवाटप समितीची सभा आयोजित केली होती. यामध्ये तीन लाखांच्या एकाच कामांसाठी ४२ सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी आॅनलाइन निविदा भरल्या होत्या. काम मिळविण्याच्या स्पर्धेचा प्रत्यय झेडपीच्या कामवाटप सभेत दिसून आला.जिल्हा परिषदेकडून जिल्हा निधी अंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्हाभरातील १४ तालुक्यात १ कोटी ०८ लाख ७६ हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. यामधून ४२ कामे करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांकडून आॅनलाइन निविदा बांधकाम विभागाने मागविल्या होत्या. यासाठी १४६ निविदा आल्या. त्यानुसार प्राप्त निविदाप्रमाणे अतिरिक्तमुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कामवाटप सभेला मुख्य लेखा वित्त अधिकारी रवींद्र येवले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत गावंडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. दुपारी १ वाजता कामवाटप सभेला प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा निधीतून लोकोपयोगी लहान कामे या लेखाशीर्षातून एक़ूण ४२ कामांपैकी अचलपूर तालुक्यातील देवमाळी या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी तीन लाख रुपयांचे दोन सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम मंजूर करण्यात आले होते. यापैकी एका कामासाठी सर्व प्राप्त निविदामध्ये ४० जणांनी काम घेण्यास इच्छा दर्शविली होती. दूसऱ्या कामांसाठी २८ जण इच्छुक होते. त्यामुळे कामवाटप सभेत ही दोनच कामे उपस्थित सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यामध्ये लक्षवेधी ठरले होते. विशेष म्हणजे, काम मिळविण्यासाठी काही जणांनी वेगवेगळे फंडे लढविण्याचा प्रयत्न केला.जिल्हा परिषदेने जिल्हा निधीतून लोकोपयोगी लहान कामे मंजूर केली होती. यात रस्ते व अन्य लहान कामांचा समावेश होता. सर्व कामे लकी ड्रॉ काढृून वाटप करण्यात आले.- प्रशांत गावंडेकार्यकारी अभियंताबांधकाम विभाग
जिल्हा परिषदेच्या एकाच कामासाठी ४० कंत्राटदारांमध्ये स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 1:16 AM
जिल्हा परिषदेमार्फत सन २०१८-१९ मधील जिल्हा निधीतून सुमारे १ कोटी ०८ लाख ७६ हजारांच्या रकमेतून ४२ कामे मंजूर केली होती. सदर कामांचे वाटप करण्यासाठी मंगळवार २३ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सुशिक्षित बेरोजगार अभियंता (सुबेअ) यांना कामवाटप समितीची सभा आयोजित केली होती.
ठळक मुद्देजिल्हा निधी : कामवाटप समितीद्वारे लकी ड्रॉचा पर्याय