अमरावती : राज्याची क्रीडाविषयक कामगिरी उंचावण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणाची क्षेत्रे विचारात घेऊन राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ निर्माण करण्यात येत आहे. या विद्यापीठाचे बोधचिन्ह (लोगो) तयार करण्यासाठी स्पर्धा आयोजिण्यात आली असून, आकर्षक बक्षिसांची तरतूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेतील सहभागाला शुल्क नाही. पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ५० हजार, ३० हजार व २० हजार रुपये अशी बक्षिसे आहेत. बोधचिन्ह सादर करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट आहे. शाळा, महाविद्यालये, चित्रकला विद्यालये आदींनी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केले आहे. स्पर्धेचे नियम, अटी व इतर माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचा ‘लोगो’ तयार करण्यासाठी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 4:12 AM