लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रेमसंबंध प्रस्थापित करून अपहरण, लैंगिक अत्याचार, खंडणी आणि धर्मांतरणासाठी डांबून ठेवल्याची तक्रार येथील फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात बुधवारी दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी फईम अब्दुल जाकीर अब्दुल (२२, रा. राहुलनगर) याला तात्काळ अटक केली आहे.युवतीच्या तक्रारीनुसार, फईम अब्दुल याने काही वर्षांपूर्वी पीडितेशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून जबरीने विवाह केला. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून धमकाविणे सुरू केले. जातिवाचक शिवीगाळ केली. बौद्ध धर्म सोडून मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी धाक दाखविला. धर्मांतरणासाठी घरात डांबून ठेवले. मारण्याच्या धमक्या दिल्या. तिच्या आई-वडिलांच्या आजाराचा फायदा घेऊन घरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप तिने पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीतून केला आहे. पोलिसांनी आरोपी फईम अब्दुलविरुद्ध भादंविचे कलम ३६३ (अपहरण करणे), ३६६ (पळवून नेऊन धमकी देणे), ३४१ (प्रतिबंध करून डांबून ठेवणे), २९५ (अ) (धार्मिक भावना दुखावणे), ३७६ (अ) (जबरी संभोग), ३८४ (खंडणी), ५०६ (धमकविणे) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ (२) अन्वये गुन्हे नोंदविले आहेत. इच्छेविरुद्ध धर्मांतरण करण्यासाठीचा गुन्हा अद्याप नोंदविण्यात आला नाही.तपास ठाणेदारांकडून माझ्याकडे आला आहे. इतर गुन्हे दाखल आहेतच. धर्मांतरणासाठी दबाव टाकल्याचीही तक्रार आहे. दाखल गुन्ह्यांमध्ये ते कलम लावलेले नाही. कलमांमध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते.- पी.डी. डोंगरदिवे, सहायक पोलीस आयुक्त
प्रेमसंबंधांत धर्मांतरणासाठी डांबल्याची अमरावतीमधील तरुणीची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 9:53 AM
प्रेमसंबंध प्रस्थापित करून अपहरण, लैंगिक अत्याचार, खंडणी आणि धर्मांतरणासाठी डांबून ठेवल्याची तक्रार येथील फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात बुधवारी दाखल करण्यात आली.
ठळक मुद्देआरोपीला अटकअपहरण, लैंगिक अत्याचार, खंडणी, अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल