झेडपीची आमसभा गाजली : महत्त्वाचे विषय प्रलंबितअमरावती : जिल्हा परिषदेची बुधवारी आयोजित सभा विविध मुद्यांवर गाजली. सभेचा अक्षरश: आखाडा झाला होता. जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये विषयांच्या मांडणीवरून जि.प. पदाधिकारी व सदस्यांमध्ये झालेली तुतू-मै मै आणि अध्यक्षांनी महत्वाच्या प्रश्नांना बगल दिल्याच्या निषेधार्थ भाजप सदस्यांनी केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. गोंधळाच्या वातावरणात कोणत्याही महत्वाच्या मुद्यावर निष्कर्षाप्रत चर्चा न होताच अध्यक्षांनी सभा गुंडाळल्याचे जाहीर केल्याने संतापलेल्या भाजप सदस्यांनी ठिय्या आंदोलन केल्याने वातावरण अधिकच तापले. बुधवारी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली. आरोग्य, शिक्षण, कृषी आदी विभागाच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना अध्यक्षांकडून उत्तर अपेक्षित होते. मात्र, उपाध्यक्षांनी हस्तक्षेप केल्यामुळे उपाध्यक्ष सतीश हाडोळे व जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे यांच्यात वादावादी झाली.
गोंधळ, आरोप अन् विरोधकांचा ठिय्या
By admin | Published: January 14, 2015 10:59 PM