शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 01:40 AM2019-07-20T01:40:30+5:302019-07-20T01:41:02+5:30
भातकुली व अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी शुक्रवारी वरील दोन्ही तालुक्यांच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भातकुली व अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी शुक्रवारी वरील दोन्ही तालुक्यांच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले.
तालुका काँग्रेस कमिटीच्या निवेदनानुसार अमरावती, भातकुली तालुक्यात पावसाअभावी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. अद्याप भातकुली तालुक्यांतील विविध गावातील शेतशिवारात पावसाअभावी पेरणी झाली नाही. दोन्ही तालुक्यांत जी पेरणी झाली आहे, त्यामधील ४० टक्के पेरणी साधली. ६० टक्के बाधित झाल्यामुळे दुबार पेरणीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात दुबार पेरणीची वेळ निघून गेली. जी पेरणी साधली, त्यात २० दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे पाण्याअभावी शेतात खांडण्या पडल्या आहेत. अमरावती तालुक्यात उष्ण वातावरणामुळे संत्राबागासुद्धा वाळल्या आहेत. ही भयावह स्थिती लक्षात घेता शासनाने अमरावती व भातकुली तालुक्यात तात्काळ सर्र्वेक्षण सुरू करावे, दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करावी व बियाणे देण्यात यावे, सरसकट पीक विमा, शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, खरीप हंगाम २०१९ पर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, शेतीसाठी विद्युत पुरवठा अखंडित देण्यात यावा आदी मागण्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. यावेळी बांधकाम सभापती जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, वीरेंद्रसिंह जाधव, मुकदरखाँ पठाण, हरीश मोरे, गजानन राठोड, बंडू पोहोकार, अभय देशमुख, नीलेश कडू, भुगूल, हिंमत मंडासे, शेखर अवघड, सौरभ किरकटे, संजय खोडस्कर यांच्यासह पदाधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.