अमरावती : सध्या वाढत असलेली महागाई, पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर, खाद्य तेलाचे वाढते दर गरीब, सामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. गरीबांचे जगणं महागले असताना केंद्र सरकार मात्र महागाई कमी करण्याऐवजी खासगीकरणात मश्ग़ूल आहे. त्यामुळे गरीब, सामान्य कुटुंबीयांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी कॉंग्रेसने राजकमल चौकात केंद्र शासनाचा विरोध म्हणून गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलला प्रतिकात्मक श्रद्धांजली अर्पण केली.
या आंदोलनात गॅस सिलिंडरला हार घालून लाकडाच्या माेळीची पूजा करून केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. केंद्र शासनाचे महागाईने प्रत्येक घराचे स्वयंपाकगृह व वाहनावर कब्जा करून कुटुंबीयतील वाहन धारकाचे आर्थिक बजेट बिघडल्याचा आरोप करण्यात आला यावेळी भाजप व केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.हे आंदोलनअमरावती शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. अंजली ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
यावेळी अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे राजू भेले, विनोद सुरीसे, कांचनमाला गावंडे, सुजाता झाडे, देवयानी कुर्वे, अर्चना सवाई, जयश्री वानखडे, शोभा शिंदे ,योगिता गिरासे, शीतल देशमुख, अर्चना बोबडे, कांचन खोडके,शीतल देशमुख , सविता धांदे, आशा अघम, सुनीता भेले, मैथिली पाटील, शिल्पा राऊत,किर्तीमाला चौधरी, हर्षा ढोक, मनाली तायडे, भाग्यश्री महल्ले, जयश्री कुबळे, अंजली उघडे, रुखसाना परवीन, कारीमा बाजी, नजमा काजी, मैथिली पाटील आदी उपस्थित होते.