'रझा अकादमीवर बंदीचे धाडस काँग्रेसमध्ये नाही; कुणाच्या इशाऱ्यावर पोलिसांवर हल्ले?' 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 11:00 AM2021-11-22T11:00:54+5:302021-11-22T11:01:41+5:30

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे रझा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्र प्रसारित केले जात आहे, तसे मुख्यमंत्र्यांचेही छायाचित्र आहे. ते का प्रसारित केले जात नाही, असा प्रश्न फडणवीस यांनी राज्य सरकारमधील मंत्र्याला केला.

Congress does not have the courage to ban Raza Academy says devendra fadnavis | 'रझा अकादमीवर बंदीचे धाडस काँग्रेसमध्ये नाही; कुणाच्या इशाऱ्यावर पोलिसांवर हल्ले?' 

'रझा अकादमीवर बंदीचे धाडस काँग्रेसमध्ये नाही; कुणाच्या इशाऱ्यावर पोलिसांवर हल्ले?' 

Next

अमरावती : रझा अकादमीचे कुणासोबत मधुर संबंध आहेत, हे सर्वश्रुत आहे. भाजपने रझा अकादमीवर बंदी आणण्याची मागणी केल्यास काँग्रेसमध्ये कारवाईचे धाडसच नाही, असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अमरावती दौऱ्यात केला. देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला आणि पीडितांची भेट घेतली. विभागीय आयुक्त कार्यालयात कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रशासनाची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 


मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे रझा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्र प्रसारित केले जात आहे, तसे मुख्यमंत्र्यांचेही छायाचित्र आहे. ते का प्रसारित केले जात नाही, असा प्रश्न फडणवीस यांनी राज्य सरकारमधील मंत्र्याला केला. काँग्रेस सत्तेत असतानाच रझा अकादमीकडून मोर्चे काढले जातात. दोन समुदायांत दंगा होतो. पाेलिसांवर हल्ले केले जातात. रझा अकादमी ही कुणाची ‘बी टीम’ आहे, हे जनतेला चांगले ठाऊक आहे, असेही फडणवीस म्हणाले. 

अमरावती, मालेगाव येथील दंगलींच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
    - दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री.

मोर्चाला परवानगी नाही, तर निघाला कसा?
अमरावती शहरात १२ नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याकांच्या मोर्चाला परवानगी नव्हती, तर हजारोंच्या संख्येने तो निघाला कसा, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. समाजकंटकांनी परतीच्या वेळी हिंदू समाजाची दुकाने लक्ष्य केली. नासधूस केली. दगडफेक करून जखमी करण्यात आले. हा सर्व प्रकार म्हणजे राज्यात दंगे भडकाविण्याचा सुनियोजित कट आणि अराजकता पसरविण्याचा डाव होता, असा आरोप त्यांनी केला.
 

Web Title: Congress does not have the courage to ban Raza Academy says devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.