१७ जागांवर विजय : राष्ट्रवादीला एक जागा, तर भाजपला भोपळा वरूड : स्थानिक बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ संचालकपदांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पडली. यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक १७ जागा मिळाल्यात. काँग्रेसच्या नरेशचंद्र ठाकरे यांच्या शेतकरी पॅनेलने बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे. राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. भाजपला मात्र खातेही उघडता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन देशमुख यांच्या सहकार पॅनलला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. सत्ताधारी भाजपचे अनिल बोंडे यांच्या कृषी सन्मान पॅनेलला खातेही उघडता आले नाही, हे विशेष. हमाल-मापारी मतदार संघामध्य एक, अडते-व्यापारी मतदारसंघात २, ग्रामपंचायत मतदारसंघातून ४ आणि सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून ११ अशा एकूण १८ संचालकांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. निवडणुकीत सेवासहकारी सोसायटीचे ७४२, ग्रामपंचायतींचे ५८३, हमाल-मापारी ७८, आणि व्यापारी १७५ अशा १ हजार ५७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून ११ जागांवर काँग्रेसचे नरेंद्र पावडे ३२२, अनिल गुल्हाने ३२१, गजानन काळे ३०३, अनिल सुपले ३००, रोशन देशमुख २९८, वनराज कराळे २९६, अमोल बोहरुपी २९३, महिला राखीव मधून रजनी भोंड ३४९, माधुरी पडोळे ३१२, विमुक्त भटक्या जातींमधून पंजाबराव कवाने ३४५, इतर मागासवर्गीय गटातून अजय नागमोते ३४६ मते घेऊन विजयी झाले.
वरुड बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व
By admin | Published: March 22, 2016 12:20 AM