शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

अमरावतीत पोस्टल मतदानातही काँग्रेस आघाडीवर; नोटाला २७ मते, १२०० ठरली मते बाद

By जितेंद्र दखने | Updated: June 6, 2024 21:40 IST

गत अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांकडून नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासंदर्भात मागणी केली जात आहे.

अमरावती : लोकसभा मतदारसंघासाठी गत २६ एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार ४ जून रोजी येथील लोकशाही भवनात पार पडली. या मतमोजणीत अंतिम मतदानाचे चित्र स्पष्ट झाले आहे.

रिंगणार असलेल्या ३७ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये सर्वाधिक मते काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना २ हजार १३५ मते मिळालीत तर भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांना १ हजार ७३४ आणि प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांनी ३१५ मते मिळाली आहेत. या तीन उमेदवारांशिवाय रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर ८० आणि बसपाचे संजयकुमार गाडगे यांना २८ मते घेतली. अन्य सर्व अपक्ष उमेदवारांना मात्र कुठे १ ते ६ अशाप्रकारे मते पोस्टल बॅलेटद्वारे मिळाले आहेत. विशेष म्हणजे ५ हजार ५७४ पैकी १२०० मते बाद ठरली असून नोटाला २७ मते पडली आहेत.

निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त असणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार शासकीय अधिकारी, कर्मचारी असलेल्या मतदारांनीदेखील या सुविधेचा लाभ घेत मतदान केले. अमरावती लोकसभा मतदारसंघात ५ हजार ५७४ मतदारांपैकी ४ हजार ३७४ टपाली मतदारांनी आपला हक्क बजावला. यातील १ हजार २०० हजार मते बाद झाली आहेत. काँग्रेसच्या उमेदवार बळवंत वानखडे यांना २ हजार १३५, तर भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांना १ हजार ७३४ टपाली मते मिळाली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत टपाली मतदारांनीही काँग्रेसला अधिक पसंती दिल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तर भाजप उमेदवार दुसऱ्यास्थानी व प्रहारचे उमेदवार दिनेश बूब हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी ८० तर बसपाचे संजयकुमार गाडगे यांना २८ टपाली मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे अपक्ष असलेल्या उमेदवारांपैकी ६ जणांना प्रत्येकी १ मत, ९ उमेदवारांना प्रत्येकी २ मते, तिघांना प्रत्येकी ३, एकाला ४, दोन उमेदवारांना प्रत्येकी ५ आणि सहा उमेदवारांना प्रत्येकी १ या प्रमाणे पोस्टल बॅलेटद्वारे मते मिळाली आहेत. सोबतच २७ मतदारांनी नोटाला मतदान केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांत तीव्र नाराजीगत अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांकडून नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासंदर्भात मागणी केली जात आहे. यासंदर्भात विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने निवेदन, आंदोलन, बेमुदत काम बंद आंदोलनसुद्धा केले आहे. मात्र अजूनही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू केलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये राज्यकर्त्याविरोधात तीव्र नाराजीचा सूर आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतही पोस्टल बॅलेट मतदानातून ही नाराजी दिसून आली.

टॅग्स :amravati-pcअमरावतीcongressकाँग्रेसlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBJPभाजपा