शेखावतांची टोलेबाजी : ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान अमरावती : माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या सत्कार सोहळ्याला तब्बल २१ काँग्रेशी नगरसेवकांनी दांडी मारली. त्यामुळे शहर काँग्रेसमधील अंतर्गत बेबनाव चव्हाट्यावर आला आहे. येथील विमलाबाई देशमुख सभागृहात रावसाहेब शेखावत यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त काँगेस कार्यकत्यांनी रविवारी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली असली तरी शहर काँग्रेसच्या कार्यकारिणीतील सदस्यांसह नगरसेवकांनी फिरवलेली पाठ दखलपात्र होती.महापालिकेत पंजावर निवडून आलेले २५ नगरसेवक आहेत. शिवाय वसंत साऊरकर आणि अमोल ठाकरे हे दोघे स्वीकृत सदस्य आहेत. या अधिकृत २७ नगरसेवकांपैकी उपमहापौर शेख जफर, सुगनचंद गुप्ता, आसिफ तवक्कल, भारत चव्हान, नुरखॉ मौजदार खॉ या पाच काँग्रेशी नगरसेवकांसह अपक्ष निवडून आलेल्या नूतन भुजाडे यांचीच उपस्थिती होती. बबलू शेखावत, विलास इंगोले यांच्यासह २१ काँग्रेशी नगरसेवकांनी मारलेली दांडी, काँग्रेसमधील शहराध्यक्षपदाचा वाद किती विकोपाला पोहचलाय याचा प्रत्यय देणारी ठरली.माझा पूर्ण वेळ विकासकामे करण्यात गेला. त्यामुळे विकासकामावरच माझा फोकस होता. पाच वर्षे भरपूर काम कलीत. मात्र कामाचे ढोल वाजवता आले नाही. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत माझे ढोल वाजल्याची बोच रावसाहेबांनी बोलून दाखवली. न जाने बादलोमे क्या साजीश हुई ,मुझ गरिब का घर मिट्टी का था ,मेरेही घर बारीश हुई.असा शेर एैकवत सवांना सर्व पदे दिली आनि वरुन म्हणतात की रावसाहेबांना राजकारण समजत नाही.हा माझ्या स्वभावाचा झायदा घेणे नव्हे काय,असा सवाल रावसाहेबानी आपल्या सत्काराला उत्तर देताना उपस्थित केला.'ते' म्हणजे बंडीखालचे श्वानमहापालिकेतील एकहाती सत्तेमुळे काहींनी काँग्रेसचाच उपमर्द चालविला आहे. आपल्यामुळेच महापालिकेत काँग्रेसची सत्ता आल्याचे दिवास्वप्न अनेकांना पडते.अशानची तुलना बंडीखाली चालणाऱ्या कुत्र्यांशीच केली पाहिजे, अशा जहाल शब्दांत रावसाहेबांनी पक्षातील बंडखोरांची खिल्ली उडविली. शेखावत यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त रिपाइंच्या ज्येष्ठ नेत्या कमलताई गवई, राष्ट्रवादीचे नेते शरद तसरे, माजी मंत्री यशवंतराव शेरेकर,माजी आ.नरीशचंद्र ठाकरे यांच्यासह भैरवसिंग शेखावत आणि सैयद अजिजुल हसन यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर उपमहापौर शेख जफर, रावसाहेब शेखावत, मंजिरी शेखावत, सुगनचंद गुप्ता, आसिफ तवक्कल, भारत चव्हान, नुरखॉ मोैजदार खॉ, अक्षय भुयार, राजा बागडे आणि माजी शहराध्यक्ष विश्वासराव देशमुख उपस्थित होते. महापालिकेतील काही काँग्रेशी नगरसेवकांवर त्यांनी टीकास्त्र सोडले. विश्वासराव देशमुखांनी कधीही माझ्या आई-वडिलांचा अपमान केला नाही. महापालिका निवडणुकीचे आव्हान परतवून लावण्यासाठी विश्वासराव देशमुख यांच्याच नेतृत्वाची गरज असल्याचे ते म्हणाले.
काँगे्रसमधील बेबनाव उघड,२१ नगरसेवकांची दांडी
By admin | Published: August 17, 2016 12:02 AM