विरोधी सदस्यांची अनुपस्थिती : सभापती, उपसभापतिपदाची अविरोध निवडणूकअमरावती: महापालिकेतील चार विषय समित्यांच्या सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक शनिवारी अविरोध पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंटने बाजी मारली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी काम पाहिले.सुदामकाका देशमुख सभागृहात सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. विधी समिती, शहरसुधार समिती, शिक्षण समिती, महिला व बाल कल्याण समिती या क्रमवारीनुसार सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक घेण्यात आली. एका समितीत नऊ सदस्य संख्या आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी फ्रंटचे सर्वाधिक संख्याबळ असल्याने भाजप-शिवसेना, बसपा, जनविकास- रिपाइंने निवडणुकीत सहभाग घेतला नाही. निवडणुकीची केवळ औपचारिकतामहापालिकेच्या विविध विषय समिती सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाने नामांकन अर्जाची उचल केली नसल्याचे बघून काँग्रेसचे गटनेता बबलू शेखावत व राष्ट्रवादी फ्रंटचे गटनेता अविनाश मार्डीकर यांनी शुक्रवारीच ही निवडणूक अविरोध करण्याचा निर्णय घेतला होता. या दोन्ही पक्षाच्या अंतर्गत करारानुसार विषय समित्यांचे प्रत्येकी दोन सभापती व उपसभापती हे पद वाटपाचे सूत्र ठरविण्यात आले होते. त्यानुसार पार पडलेल्या अविरोध निवडणुकीत पद वाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवडणुकी दरम्यान कोणतीही अप्रिय घटना होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्तसुध्दा होता. नगरसचिव मदन तांबेकर, विधी अधिकारी अरविंद पाटील, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, मकवाने, नंदू पवार आदी कर्मचार्यांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदविला.अविरोध निवड झालेले सभापती-उपसभापतीविधी समिती सभापती तमिजाबी अहमद खाँ तर उपसभापती रहिमाबी अ. रफिक, शहर सुधार सभापती कांचन ग्रेसपुंजे तर उपसभापती भूषण बनसोड, शिक्षण समिती सभापती हमिदाबी शेख अफजल तर उपसभापती अर्चना राजगुरे, महिला व बाल कल्याण सभापती नीलिमा काळे तर उपसभापती अर्चना इंगोले या पदाधिकार्यांची अविरोध निवड झाली आहे.
विषय समित्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंटचा कब्जा
By admin | Published: June 07, 2014 11:38 PM