शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सत्तेसाठी काँग्रेस-एनसीपी-सेनेची गट्टी

By admin | Published: March 20, 2017 12:04 AM

राजकारणात कायम कुणी कुणाचा शत्रू किंवा मित्र म्हणून राहत नाही, याचा प्रत्यय जिल्हा परिषदेच्या नव्या राजकीय समीकरणावरून दिसून आला.

जिल्हा परिषद : सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, मंगळवारी निवडणूकअमरावती : राजकारणात कायम कुणी कुणाचा शत्रू किंवा मित्र म्हणून राहत नाही, याचा प्रत्यय जिल्हा परिषदेच्या नव्या राजकीय समीकरणावरून दिसून आला. सत्तास्थापनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्षांनी मैत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर रविवार १९ मार्च रोजी शिक्कामोर्तब झाले आहे. या नव्या मैत्रीने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाअध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य असलेल्या काँग्रेस पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ शिवसेना व दोन अपक्ष सदस्यांनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सत्तास्थापनेसाठी काँग्रेस सोबत वरील सर्व पक्ष संयुक्त निवडणूक लढणार आहेत. यात अध्यक्षपद काँग्रेसकडे, तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे राहणार आहे. याशिवाय चार विषय समिती सभापती, जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद स्थायी समितीचे सदस्यपदाकरिता काँग्रेसला शिवसेना, अपक्ष यांचे बिनशर्त समर्थन देण्यावर या बैठकीत एकमत झाले. या युतीच्या चर्चेदरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, माजी आमदार केवलराम काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन देशमुख याशिवाय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड, राजेश वानखडे, प्रशांत वानखडे, दिनेशनाना वानखडे, सुधीर सूर्यवंशी, नाना नागमोते, बाळासाहेब भागवत, उमेश अर्डक, सुनील भालेराव आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या चर्चेत सभापती पदाचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार काँग्रेसकडे राहतील, यावर एकमताने संमती देण्यात आली. ही सर्व राजकीय खेळी लक्षात घेता आता जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता येणार आहे. जिल्हा परिषद सभागृहाची सदस्य संख्या ५९ आहे. सत्ता स्थापनेसाठी ३० हा मॅजिक फिगर आहे. सध्या काँग्रेस व रिपाइं मिळून २७ सदस्य आहेत. आता नव्या राजकीय मैत्रीमुळे काँग्रेसकडे राष्ट्रवादीचे दोन, शिवसेना ३ आणि अपक्ष दोन असे एकूण ३४ सदस्य संख्या झाली आहे. यातही अधिक वाढ होण्याची शक्यता असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरूध्द ऊर्फ बबलू देशमुख यांनी सांगितले. एकीकडे काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी मार्ग मोकळा झाला असला तरी विरोधी पक्ष असलेल्या भाजपानेही जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक मॅजिक फिगर जुळविण्यासाठी सर्वच प्रकारे फंडे वापरणे सुरू केले आहेत. परंतु रविवारी घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे भाजपाला आता सत्तेबाहेर राहून विरोधी पक्षात बसावे लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)काँग्रेसचा अध्यक्ष तर उपाध्यक्ष सेनेचा होणारजिल्हा परिषदेत यावेळी सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने नवी राजकीय तडजोड केली आहे. यामध्ये २१ मार्च रोजी होणाऱ्या अध्यक्ष व उपाअध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्षपद हे काँग्रेसकडे, तर उपाअध्यक्ष पद शिवसेनेकडे राहणार आहे. तर विषय समितीवर काँग्रेस व अन्य मित्रपक्षांना संधी मिळण्याची शक्यता यासर्व घडामोडींवरून दिसून येते.नव्या शिल्लेदारांची नावे गुलदस्त्यातजिल्हा परिषदेचे नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सभापती कोण होणार, याबाबत सर्वच ठिकाणी अनेक नावे चर्चेत आहेत. त्यामुळे नेमक ी नवे शिलेदार म्हणून कुणाची वर्णी लागणार हे मंगळवार २१ मार्च रोजीच स्पष्ट होणार आहे. सध्या अध्यक्ष व उपाअध्यक्ष पदाचे उमेदवार कोण आहेत याची नावे मात्र राजकीय पक्षांनी उघड केली नाहीत. पक्षनिहाय बलाबलकाँग्रेस-२६,रिपाइं-१, राष्ट्रवादी-५, प्रहार-५, भाजपा १३, शिवसेना ३, बसपा-१, युवा स्वाभिमान-२, स्वाभिमानी शेतकरी संघटना-१, लढा-१, अपक्ष-१ एकूण ५९सदस्य देवदर्शनालाकाँग्रेस व राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे व अपक्ष सदस्यांमध्ये फुटू नये यासाठी हे सर्व सदस्य देवदर्शन व सहलीवर शनिवार रात्री विविध ठिकाणी रवाना झाले आहेत. मागील वेळी काँग्रेसला अध्यक्ष, उपाअध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दिवशीच झालेल्या दगाबाजीमुळे सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा फंडा वापरण्यात आला आहे. सध्या हे सर्व सदस्य संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. या सदस्य, नेतेही गेले आहेत.