एकत्रित पान ४ वर
अमरावती : केंद्र शासनाने केलेल्या इंधन दरवाढीविरोधात तालुका, शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्यावतीने सोमवारी तालुकास्तरावर आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
तिवसा : सिलिंडर हाती घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन केले. जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप काळबांडे, संजय देशमुख, माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे, शहराध्यक्ष अतुल देशमुख, तिवसा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रीतेश पांडव, सचिन राऊत, प्रमोद बोराळकर,योगेश वानखडे, विलास हांडे, बादल पाळेकर, किसनराव मुंदाणे, नगरसेवक दिवाकर भुरभुरे, आनंद शर्मा, उमेश राऊत, प्रवीण हिमाने, महेंद्र तायडे, प्रमोद विघ्ने, सुनील राऊत, दीपक पावडे, सुनील बाखडे, आदित्य भुयार, सागर राऊत, राजू किरकटे, प्रसाद लाजूरकर यांच्यासह शेतकरी बांधवदेखील आंदोलनात सहभागी झाले.
नांदगाव खंडेश्वर : पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने नांदगाव खंडेश्वर येथील पेट्रोल पंपावर निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव परीक्षित जगताप यांच्या नेतृत्वात पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी लॉलीपॉप वाटून पेट्रोल व डिझेल दरवाढीकडे लक्ष वेधले. यावेळी शहर अध्यक्ष अमोल धवसे, माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर, सचिन रिठे, सुधाकर डोंगरे, गजानन मारोटकर, मंगेश जोगे, प्रदीप ब्राह्मणवाडे, म. इद्रीस, अमोल चवाळे, राठोड, भीमराव रंगारी, अजय लाड, अक्षय गुल्हाने, उत्तम पवार, भीमराव राऊत, प्रकाश चवके, गजानन गालफाटे, गजानन घन, गोलू ठाकरे, राहुल गवाले व शहर व तालुका काँग्रेसची मंडळी उपस्थित होती.
चांदूर बाजार तालुका काँग्रेसचे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन
चांदूर बाजार : शहरातील पेट्रोल पंपसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलत आणून घोषणाबाजी केली. तालुकाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हसनखाँ पठाण, सतीश धोंडे, बाबूराव जवंजाळ, भाई देशमुख, हरिभाऊ बोंडे, उद्धव बंड, ज्ञानेश्वर काळकर, किशोर किटुकले, प्रकाश जवंजाळ, रामदास भोजने, विकास सोनार, राजाभाऊ बंड, अवधूत मातकर, विकास शेकार, नीलेश डांगे, आशिष चौधरी, पंकज नेहारे, शुभम बारबुद्धे, सचिन बंड, अनिकेश जवंजाळ, शैलेश टेकाळे, योगेश विघे, दिनेश काळे, नंदकिशोर पुणकर, मंगेश ठाकरे, सुरेश नागपुरे, विनायक गवई, दिलीप डाखोरे, नीलकंठ चव्हाण उपस्थित होते.
अंजनगाव सुर्जी : तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण व शहरतर्फे लखाड येथे पेट्रोल पंपावर निदर्शने करण्यात आली. आमदार बळवंत वानखडे, तालुकाध्यक्ष प्रमोद दाळू, निखील कोकाटे ,सुधाकर खारोडे, बबलू काळमेघ, रावसाहेब निचळ, मिलिंद निचळ, सत्यविजय निपाणे, धम्मपाल लबडे, निलेश राक्षसकर, रणजित दाळू, अजय काळमेघ, बाबाराव चौखंडे, सुनील रेचे, संजय काळमेघ, दिलीप देशमुख, गजानन धोटे उपस्थित होते. शहर काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष प्रदीप देशमुख, संजय सरोदे, नीलेश ढगे, सलामुद्दीन, जहीर बेग, आशिक अन्सारी, कलीमभाई, राजू कुरेशी, सुयोग खाडे, गिरीश लोकरे, शोएब खान, विनोद हाडोळे, विदर्भ बोबडे यांनी आंदोलन केले.