लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे व लोखंडी ग्रीलमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या समस्या सोडविण्यासाठी शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक साळवे यांच्या दालनात शहर काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी शहर जिल्हाध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात ठिय्या दिला.राजकमल चौक येथील वळणावर रस्त्यात अडथळा आणणारी लोखंडी ग्रील आणि सुंदरलाल चौकातील म.जी.प्रा.चा गेट व्हॉल्व यासंबंधाने लवकरच उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक साळवे यांनी दिले. अपघातास कारणीभूत ठरणारे रस्त्यावरील खड्डे तातडीने दुरूस्त करण्याची हमी दिली. सोबतच ही कामे करणाºया कंत्राटदाराचे नाव कामावरील खर्च व दुरूस्तीची माहिती सर्वसामान्यांना मिळावी, यासाठी दर्शनी भागात फलक लावून त्याठिकाणी संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांकही लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी नाना सोनी, रमेश राजोरे, अभिनंदन पेंढारी, आसिफ मन्सुरी, आर.डी. देशमुख, राजेश चव्हाण, निहाज खान, फिरदौस गादी, विजू पुंगसे आदींची उपस्थिती होती.अपघातमुक्त रस्त्यांचा प्रस्तावशहरातील शाळा व दवाखान्यांसमोरील रस्ते अपघातमुक्त करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर खोलापुरी गेट ते विद्यापीठापर्यंतचा रस्ता चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी वेगवेगळा असावा, असा प्रस्ताव किशोर बोरकर यांनी दिला. इर्विन ते विद्यापीठापर्यंतच्या मार्गावर दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी स्वतंत्र ट्रॅक निर्मिती करण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिले.
काँग्रेसचा ठिय्या, उपाययोजनांची हमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 11:13 PM
शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे व लोखंडी ग्रीलमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या समस्या सोडविण्यासाठी शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता .....
ठळक मुद्देअपघातप्रवण स्थळे : महिनाभरात होणार दुरूस्ती