नेहरू मैदान येथील पुरातन व ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूचे जतन करून जिल्ह्याच्या वैभवाला जपता येईल, असे संग्रहालय निर्माण करण्याबाबत एकमताने सर्व ठराव मंजूर करण्यात आला. सहविचारी सभा माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात पार पडली. शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत व माजी महापौर विलास इंगोले, माजी स्वीकृत नगरसेवक कोमल बोथरा यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.
---------------------
यशोमती ठाकूर, बच्चू कडू यांच्या हस्ते नानक रोटी ट्रस्टचा आज गौरव
अमरावती- शिवसेनेचे नेते दिवंगत सोमेश्वर पुसतकर यांच्या नावे लोक फाऊंडेशनच्यावतीने दिल्या जाणारा पहिला 'लोकगौरव पुरस्कार' सोमवार, २ ऑगस्ट रोजी नानक रोटी ट्रस्ट या समाजसेवी संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ऑडीटोरीयमध्ये दुपारी १ ते ४ या वेळात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नेते बी.टी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पालकमंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू , 'वनराई' नागपूरचे विश्वस्त गिरीश गांधी व श्री हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. .