आॅनलाईन लोकमतपरतवाडा : अचलपूर विभागांतर्गत येणाºया सहा तालुक्यांतील ९५ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा थकबाकीमुळे आठवड्यापासून खंडित करण्यात आला असून, चारशेवर ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याचे कनेक्शन महिन्याभरात कापले जाणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने जनआक्रोश खदखदत असल्याचे चित्र आहे.महावितरणच्या अचलपूर उपविभागांतर्गत अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, धारणी, चिखलदरा, चांदूरबाजार या सहा तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यातील मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेचे वीज देयक अनेक वर्षांपासून नियमित भरलेच नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात थकबाकी झाल्याने १२ फेब्रुवारीपासून वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणने सुरू केली आहे.५६५ योजना;१७ कोटींची थकबाकीसहा तालुक्यांमध्ये शहर व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाºया ५६५ योजनांवर महावितरणची १६ कोटी ९० लाख ९४ हजारांची थकबाकी आहे. ही थकबाकी तातडीने भरली जावी, यासाठी महावितरणतर्फे वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविण्यात आली आहे.२८ ग्रामपंचायतींनी घेतली तात्पुरती मुदत९५ पैकी २८ ग्रामपंचायतींनी चार लाखांची थकबाकी भरून तात्पुरती मुदत घेतली आहे. चारशेवर योजनांसाठी १५ दिवसांच्या मुदतीची नोटीस बजावण्यात आल्या आहेत.पथ्रोट, कासमपूर, जवळापूर, हिरूळपूर्णा, असदपूर, धामणगाव गढी, सर्फापूर, येवता, हंतोडा, विहिगाव, शिंदी आदी मोठ्या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.१७ कोटींची थकबाकी असल्याने ५६५ पैकी ९५ योजनांचे कनेक्शन कट केले. २८ योजनांची चार लाखांची थकबाकी भरली आहे. उर्वरित चारशेवर योजनांसाठी १५ दिवसांची नोटीस बजावली आहे. १२ फेब्रुवारीपासून ही मोहीम सुरू आहे.- दीपक सोनोने, कार्यकारी अभियंता, महावितरण, अचलपूर
९५ ग्रामपंचायतींचे कनेक्शन कट, चारशे रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:23 PM
अचलपूर विभागांतर्गत येणाºया सहा तालुक्यांतील ९५ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा थकबाकीमुळे आठवड्यापासून खंडित करण्यात आला असून, चारशेवर ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याचे कनेक्शन महिन्याभरात कापले जाणार आहे.
ठळक मुद्देपाण्यासाठी हाहाकार : अचलपूर विभागाच्या सहा तालुक्यात १७ कोटींची थकबाकी