शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

रेल्वेत कॉलेज बॅगमधून दारू अन् गुटख्याची खेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 10:23 PM

रेल्वेत कॉलेज बॅगची तपासणी होत नाही. याचा नेमका फायदा घेत नवख्या युवकांकडून कॉलेज बॅगमधून दारू आणि गुटखा तस्करी चालविली आहे. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात बडनेरा येथून हा माल रेल्वेने जातो. सुरक्षा यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार बिनधास्तपणे सुरू आहे.

ठळक मुद्देनवख्या युवकांकडून तस्करी : बडनेरा येथून पूलगाव, वर्धेत पोहचतो माल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वेत कॉलेज बॅगची तपासणी होत नाही. याचा नेमका फायदा घेत नवख्या युवकांकडून कॉलेज बॅगमधून दारू आणि गुटखा तस्करी चालविली आहे. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात बडनेरा येथून हा माल रेल्वेने जातो. सुरक्षा यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार बिनधास्तपणे सुरू आहे.रेल्वेच्या धावत्या गाड्यांमध्ये अवैध दारू, गुटखा तस्करीसाठी रेल्वे गाड्यातून १८ ते ३० वयोगटातील युवकांचा वापर केला जात आहे. कॉलेजचे विद्यार्थी असणार, अशी या युवकांची राहणीमान आहे. पुलगाव, वर्धा असे दिवसातून दोन ते तीनवेळा दारू, गुटखा तस्करीसाठी कॉलेज बॅगचा वापर करतात. काही धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये कॉलेज बॅगमधून गुटखा विक्री करीत आहे. ऐरवी ते कॉलेजचे विद्यार्थी भासतात. परंतु, कॉलेज बॅगमधून युवक दारू, गुटख्याची तस्करी करीत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. दारू विक्रेत्यांनी या युवकांना रेल्वे प्रवासासाठी महिनाभराचे तिकीट काढून दिले आहे. पाठीवर कॉलेज बॅग टाकून ते मोहीम फत्ते करतात. दारू, गुटखा तस्करीसाठी युवकांना विशेष रक्कम दिली जाते. बडनेरा ते पुलगाव, वर्धा असा दारू तस्करीचा मार्ग या युवकांनी निवडला आहे. यासाठी रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल कोणत्याही उपाययोजना करीत नाही.रेल्वेच्या पॅन्ट्रीकारमध्ये मिळते दारूधावत्या रेल्वे गाड्यांमध्ये जेवण, शीतपेय, खाद्यपदार्थ पुरवठा करणारी यंत्रणा म्हणजे पॅन्ट्रीकार (स्वतंत्र डबा) आहे. मात्र, धावत्या गाड्यात जेवण पुरवठा करणाऱ्या कर्मचाºयांकडे प्रवाशांनी कोणत्याही ब्रॅन्डच्या दारूची मागणी केली. ती सहजतेने उपलब्ध होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याकरिता प्रवाशांना जास्त रक्कम मोजावी लागते. बरेचदा हे कर्मचारी स्वत:हून प्रवाशांना वाईन हवी का, अशी विचारणा करतात. पॅन्ट्रीकारमध्ये दारू विक्री व्यवसाय फोफावला आहे.धावत्या गाड्यांत कॉलेज बॅगमधून दारू, गुटखा तस्करी होत असताना अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. मात्र, त्याअनुषंगाने संशयास्पद युवकांकडील कॉलज बॅगची तपासणी करून दारू तस्करीबाबत उलगडा केला जाईल. तशा सूचना आरपीएफ जवानांना दिल्या जातील.- राजेश बढे, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल बडनेरा