लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील चार कोरोनाबाधित मायलेकींची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने या चारही जणींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, तर जळगाव आर्वी येथील एका आदिवासी महिलेचा थ्रोट स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने धामणगाव तालुका आता कोरोनामुक्त झाला आहे.धामणगाव शहरातील धवणेवाडी आंबेडकरनगर परिसरातील प्रथम एका २१ वर्षीय युवतीला कोरोनाची लागण झाली होती. तिचा पॉझिटिव्ह अहवाल १८ मे रोजी, तर त्यानंतर तिच्यासोबत दवाखान्यात असलेल्या आई व दोन बहिणीलाचा अहवाल १९ मे रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. हे सर्व चारही रुग्ण सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल होते. गुरुवारी त्यांची १४ दिवसांनंतर दुसरी चाचणी घेण्यात आली, तो अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे चौघींना गुरुवारी सायंकाळी सुट्टी देण्यात आल्याची माहिती वर्धा येथील जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी दिली.विशेषत: पोटाची खळगी भरण्यासाठी तालुक्यातील जळगाव आर्वी येथील पारधी बांधव मुंबई येथे गेले होते. मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे येथील १९ महिला व पुरुष १८ मे रोजी धामणगाव रेल्वे तालुक्यात ट्रकने परतले. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जळगाव आर्वी येथे विलगीकरणासाठी पुरेशी जागा नसल्याने स्व. दादाराव अडसड शारीरिक शिक्षण महाविद्यालयात १४ दिवस त्यांना ठेवण्यात आले. दरम्यान येथील १८ जनांपैकी एका ३१ वर्षीय महिलेला मुबंईहून परतल्यावर पाच दिवसांनी ताप आला होता. औषधोपचाराने ताप कमी झाला नाही. त्यात अनेकजण मुबंई कंटेनमेंट झोनमधून आल्याने सदर महिलेत कोरोनाची काही लक्षणे आढळल्याने थ्रोच स्वॅब घेण्यासाठी बुधवारी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले होते. गुरुवारी सकाळी तिचे थ्रोड स्वॅब घेण्यात आले. शुक्रवारी आलेल्या अहवालात त्या निगेटिव्ह निष्पन्न झाल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी महेश साबळे यांनी सांगितले. नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. घरी सुरक्षित राहावे, असे आवाहन साबळे यांनी केले आहे.
दिलासा; धामणगाव तालुका कोरोनामुक्त; त्या चारही मायलेकींचा दुसरा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 3:10 PM
अमरावती शहरातील चार कोरोनाबाधित मायलेकींची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने या चारही जणींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, तर जळगाव आर्वी येथील एका आदिवासी महिलेचा थ्रोट स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने धामणगाव तालुका आता कोरोनामुक्त झाला आहे.
ठळक मुद्देजळगाव आर्वीच्या महिलेचा रिपोर्टही निगेटिव्ह