------------------
शेगाव नाका ते रहाटगाव मार्ग रस्ता उखडला
अमरावती : स्थानिक शेगाव नाका ते रहाटगाव मार्ग यादरम्यान जागोजागी रस्ता उखडला आहे. त्यामुळे या मार्गावर वाहन चालकांना रस्ता शोधावा लागत आहे. मार्गावर पडलेले खड्डे दुरूस्त करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
------------------------
गरिबांचा फ्रीज बाजारपेठत दाखल (फोटो आहे)
अमरावती : गत दोन दिवसांपासून उन्हाळ्याची चाहुल लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तापमान वाढत असून, थंड पाणी वापराकडे नागरिकांचा कल वाढला आहे. अशातच गरिबांचा फ्रीज असलेले मातीचे माठ विक्रीस दाखल झाले आहेत. १५० ते २०० रुपये इतकी मातीच्या माठाची किंमत आहे.
--------------------------------
विलासनगरात नालीतील कचरा समस्या कायम
अमरावती : येथील विलासनगरात नालीतील कचरा बाहेर काढल्यानंतर तो बाजुलाच ठेवण्यात येतो. नालीलगतचा कचरा त्वरित उचलला जात नाही. त्यामुळे नालीतील कचरा साचृून राहतो. या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचत आहे. कचरा लगेच उचलावा, अशी मागणी आहे.
--------------------------