अमरावती : या बैठकीतूनच बेलोरा विमानतळाच्या विकासाची दिशा ठरविण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात वीज, पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने १३ कोटी रुपये मंजूर केले आहे. या निधीतून विमानतळावर पाणी पुरवठा हा थेट बडनेरा येथील जलकुंभातून करण्याचे प्रस्तावित आहे. जलवाहिनी टाकणे, जीएसआर प्रणालीने पाणी साठविणे, विमानतळ परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकणे आदीे कामे केले जातील. त्याकरीता दोन कोटी १४ लाख रुपये खर्च केले जाईल. तसेच वीजेचा प्रश्न त्वरेने सोडविण्याचा सूचना राज्य शासनाच्या आहे. बेलोरा विमानतळ परिसरात असलेली उच्च दाब वीज वाहिनी स्थलांतर केली जाईल. विमानतळावर वीजेची समस्या कायम सोडविता यावी, यासाठी वीज निर्मिती उपकेंद्र निर्माण केले जाणार आहे. त्यासाठी १० कोटी ९७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. काही महिन्यांपासून रखडलेल्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे हे सातत्याने प्रयत्नशिल आहेत. विमानतळाच्या वीज, पाण्याचा प्रश्न सुटल्याने रस्ते निर्मिती, एटीएस टॉवर, अतंर्गत रस्ते, धावपट्टी वाढविणे, पायाभूत सुविधा आदी प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली. विमानतळाचा विस्तार व विकासासाठी तीन वर्षांपूर्वीच ३८१ हेक्टर जागा संपादित करण्यात आली आहे. जागेचा मोबदला प्रकल्पग्रस्तांना देण्यात आला आहे.रस्त्यांसाठी २२ कोटींची गरजबेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणात रस्ते निर्मिती प्रस्तावित आहे. त्याकरीता २२ कोटी रुपयांची गरज आहे. अकोला ते यवतमाळ वळण मार्ग जळू गावापर्यत पाऊणे चार कि. मी. लांब, बेलोरा विमानतळाच्या समोरील मुख्य मार्ग २.९० कि.मी. लांब तसेच निंभोरा गावापर्यतचा रस्ता दिड कि.मी. लांब निर्माण करण्यासाठी सार्वजनिक बाधंकाम विभागाने २२ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे.१८ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात बैठकबेलोरा विमानतळाच्या विकासाची रुपरेषा ठरविण्यासाठी १८ नोंव्हेबर रोजी मुंबई मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्रिय भूपुष्ठमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षस्थानी होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, आ. रवी राणा, आ. वीरेंद्र जगताप यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील.धावपट्टीची लांबी वाढविणे आवश्यकबेलोरा विमानतळाची धावपट्टी हल्ली १३७२ मिटर लांबीची आहे. मात्र, विमान सेवा सुरु करायची झाल्यास किमान धावपट्टीची लांबी ही १८०० मिटर लांब असणे आवश्यक आहे. धावपट्टीसाठी निधी मंजूर नाही. परंतु येत्या काळात धावपट्टीसाठी निधी मंजूर होईल, असे संकेत आहे. ३२०० मिटर लांब धावपट्टी तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
वीजनिर्मिती केंद्राचे निर्माण
By admin | Published: November 13, 2015 12:25 AM