लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : तालुक्यातील विश्रोळी गावातील ठक्करबाबा योजनेंतर्गत बांधण्यात आलेले आदिवासी भवन हे नियोजित जागेवर न बांधता अन्यत्र बांधण्यात आले. रेड झोनमध्ये बांधकाम करण्यात आलेले हे आदिवासी भवन कुचकामी ठरले आहे.सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या विश्रोळी येथे ठक्करबाप्पा योजनेमधून सन २०१६-१७ मध्ये १२० लक्ष ५० हजार रुपयांचे आदिवासी भवन मंजूर करण्यात आले होते. हे भवन आदिवासीबहुल वॉर्ड क्रमांक ३ मध्ये अंगणवाडीजवळ होणे आवश्यक होते. याबाबत मंजुरी मिळाली तरी गावकऱ्यांची दिशाभूल करून सरपंच व सचिव यांनी हे आदिवासी भवन पूर्णा प्रकल्प वस्तीजवळ स्मशानभूमीला लागून पूर्णा नदीच्या रेड झोन एरियामध्ये बांधकाम केले. यामध्ये शासनाची दिशाभूल करण्यात आली तसेच शासकीय निधीचा अपहार करण्यात आल्याची तक्रार विश्रोळी येथील गिरीश वाटाणे यांनी केली आहे.आदिवासी भवन पूर्णा नदीच्या काठी रेड झोनमध्ये असल्यामुळे त्याला केव्हाही नदीच्या पुराचा धोका होऊ शकतो. नियमाप्रमाणे रेड झोनमध्ये कोणतेही बांधकाम केले जाऊ शकत नाही. तथापि, नियम धाब्यावर बसवून शासकीय कामच विश्रोळी येथे या पट्ट्यात करण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकारी व संबंधित पदाधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केल्याचा आरोप केला आहे. रेड झोनमधील हे बांधकाम आदिवासी बांधवांकरिता कुचकामी ठरल्याने असंतोष व्यक्त होत आहे.
‘रेड झोन’मध्ये बांधकाम आदिवासी भवन कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 1:12 AM
तालुक्यातील विश्रोळी गावातील ठक्करबाबा योजनेंतर्गत बांधण्यात आलेले आदिवासी भवन हे नियोजित जागेवर न बांधता अन्यत्र बांधण्यात आले. रेड झोनमध्ये बांधकाम करण्यात आलेले हे आदिवासी भवन कुचकामी ठरले आहे.
ठळक मुद्देबांधकामात अपहाराचा आरोप : विश्रोळी येथील आदिवासी बांधवांची दिशाभूल