शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

कंत्राटदारांच्या फायलींना अर्थकारणाचा मुलामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 11:42 PM

देयकांसह अन्य प्रशासकीय कामकाजाच्या फाईल्स डाकेद्वारे विभागप्रमुख, उपायुक्त वा आयुक्तांकडे जाणे अभिप्रेत असताना बहुतांश कंत्राटदार या फायली स्वत: हाताळत असल्याने महापालिकेत अर्थकारण बोकाळले आहे.

ठळक मुद्देट्रॅकिंग गुंडाळली : विभाग प्रमुखांचे अभय, लाचखोरीला वाव

आॅनलाईन लोकमतअमरावती : देयकांसह अन्य प्रशासकीय कामकाजाच्या फाईल्स डाकेद्वारे विभागप्रमुख, उपायुक्त वा आयुक्तांकडे जाणे अभिप्रेत असताना बहुतांश कंत्राटदार या फायली स्वत: हाताळत असल्याने महापालिकेत अर्थकारण बोकाळले आहे. अकोल्याच्या उपायुक्ताला त्याच्या स्वीय सहायकासह एसीबीने अटक केल्यानंतर आठवडाभर कंत्राटदारांच्या थेट घुसखोरीला लगाम लावण्यात आला होता. तथापि पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ची परिस्थिती ओढविली आहे. विशेष म्हणजे कंत्राटदार स्वत: घेऊन येणाºया फायलींना अर्थकारणाचा मुलामा देत असल्याने कोणत्याही अधिकारी कर्मचाºयाला त्यात काहीही वावगे वाटत नाही.स्वत: फाईल्स घेऊन गेल्यानंतर ती फाईल चर्चेसाठी वा अन्य कारणांसाठी थांबविली जात नाही, हे वास्तव लक्षात आल्याने कंत्राटदार ‘जाडजूड ’फाईल घेऊन आयुक्त आणि दोन्ही उपायुक्तांसह अन्य विभागप्रमुखांच्या स्वाक्षºया मिळवून उखळ पांढरे करून घेत आहेत. या बेबंदशाहीला अटकाव घालण्यसाठी पुन्हा एकदा आयुक्तांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. कंत्राटदार स्वत: त्यांनी केलेल्या कामाची देयके काढण्यासाठी स्वत:च संबंधित विभागाच्या कनिष्ठ लिपिकाकडून देयके बनवून घेतात आणि स्वत:च सर्व संबंधित अधिकाºयांची स्वाक्षरी घेऊन आणि ठरलेली बिदागी देऊन फाईल ओके करतात. या सर्व प्रकारात महापालिका प्रशासनाच्या पारदर्शकतेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. तथापि देयकांच्या फाईल्स मंजूर करून घेण्यासाठी जे कंत्राटदार स्वत: अधिकाºयांपुढे जातात, त्यांचेकडून मालिकेतील सर्वच अधिकारी, कर्मचाºयांचे खिसे गरम केले जात असल्याने ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी परिस्थिती आहे.‘कंत्राटदारच हाताळतात देयकांच्या फाईली’ या शिर्षकाखाली ‘लोकमत’ने २१ जुलै रोजी महापालिकेतील हा अनधिकृत प्रकार प्रकाशझोतात आणला होता. त्या वृत्ताची दखल घेत आयुक्तांनी तातडीने कार्यालयीन परिपत्रक काढून ते सर्व विभागप्रमुखांना देण्याचे आदेश दिले. बरहुकूम ते परिपत्रक सर्व विभागप्रमुखांकडे पोहोचलेत खरे. तथापि चार महिन्यांनंतरही ते परिपत्रक फाईलबंदच राहिले. कंत्राटदारांच्या थेट शिरकावाला आवर घालण्याचे औदार्य कोणत्याही अधिकाºयाला दाखविता आले नाही.‘नवीन’ कारनामाशहरात ‘बीओटी’तत्त्वावर काही संकुले साकारणाºया ‘नवीन ’विकसकांसोबत तर वरिष्ठ अधिकाºयांची गट्टी महापालिकेत खास चर्चेत आहे. या महाशयाकडे विभागप्रमुखांना ‘भाव’ न देता थेट आयुक्तांकडे जाऊन काम यशस्वी करण्याची हातोटी आहे. आयुक्त हेमंत पवार आणि एडीटीपी सुरेंद्र कांबळे यांच्याकडे ते स्वत: फाईल नेऊन कामाला वा देयकाला मंजुरी मिळवितात. त्यांच्या फाईल्ससाठी कुणीही डाक वा लिपिकाचा आग्रह धरत नाही.असे होते आदेशकंत्राटदारांच्या घुसखोरीवर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला. त्या वृत्ताची आयुक्त हेमंतकुमार पवार यांनी लागलीच दखल घेतली. कंत्राटदारांकडून फाईल्स हाताळण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून कार्यालयीन शिस्तीस बाधक आहे. सबब, यापुढे कोणताही कंत्राटदार देयकांच्या किंवा इतर नस्ती व्यक्तीश: हाताळताना दिसून आल्यास ती नस्ती ज्या विभागाची आहे. त्या विभागप्रमुखांसह संबंधित लिपिकास व्यक्तीश: जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला होता.राठोड यांच्या केबीनमध्ये कंत्राटदारांची गर्दीमहापालिकेचे मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड यांच्या दालनात अन्य सर्व विभागाच्या तुलनेत विविध कामे करणाºया कंत्राटदारांची अधिक उठबैस आहे. अनेक कंत्राटदार त्यांच्यासमोर थेट फाईल नेऊन काम फत्ते करतात. राठोड हे ‘डीडीओ’च्या भूमिकेत असल्याने कदाचित त्यांच्याकडे कंत्राटदार अधिकच आशाळभूत नजरेने पाहत असतील, ही शक्यताही नाकारता येत नाही. उपायुक्तांची दालनेही या प्रकाराला अपवाद नाहीत. सुरक्षारक्षक असोत की, संगणक पुरविणारा अभिकर्ता थेट जीएडीत जाऊन प्रशासकीय फाईल हाताळतो. बाजार परवानात तर कंत्राटदार अभिकर्त्यांची छानच आवभगत केली जाते.