शेतकऱ्यांना दिलासा : नाफेडचे अधिकारी लावणार बोलीअमरावती : आतापर्यंत शेतकरी नाफेडने ठरविलेल्या ठिकाणी जाऊन शेतमालाची विक्री करीत होते. आता मात्र, नाफेड व जिल्हा वितरण विभागाचे अधिकारी बाजार समित्यांमध्ये जाऊन शेतमालाची हमीभावात खरेदी करणार आहेत. त्यामुळे व्यापाऱ्याकडून होणाऱ्या लूटीवर निर्बंध येणार आहे. शासनाच्या वतीने दरवर्षी शेतमालाचे हमीभाव जाहीर होतात. त्यानंतर नाफेडच्या वतीने जिल्हा वितरण अधिकारी कार्यालयामार्फत शासकीय दरात खरेदी केंद्र उघडण्यात येते. या ठिकाणी शेतकरी शेतमाल घेऊन जातात व विक्री करतात या ठिकाणी शेतकरी शेतमाल घेऊन जातात व विक्री करतात. मात्र, या ठिकाणी शेतमाल विक्री करण्यासाठी मालाचा सरासरी दर्जा (एफएक्यू) यासह विविध अटींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. कमी दर्जाच्या शेतमालाची या ठिकाणी खरेदी करण्यात येत नाही. तसेच अनेकदा कृषि उत्पन्न बाजार समितीत शासनाने ठरविलेल्या हमीदरापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी सुरू असते. त्यामुळे जिल्हा वितरण कार्यालयातील केंद्रप्रमुख तसेच खरेदी विक्री संस्थेचे व्यवस्थापक बाजारर समितीत जाऊन शेतमालाची खरेदी करणार आहेत. ज्याप्रमाणे व्यापारी बाजार समितीत फिरून बोली लावतात. त्याचप्रमाणे ही बोली राहणार आहे. हमीदरापेक्षा जास्त दरात बोली लावणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या चांगल्या दर्जाच्या शेतमालास किमान हमीभावाईतका भाव मिळू शकणार आहे. (प्रतिनिधी)ओलावा तपासणाऱ्या यंत्राची होणार तपासणीशेतमालातील ओलावा तपासण्याकरिता प्रत्येक व्यापाऱ्याकडे हे यंत्र असेल. या इलेक्ट्रॉनिक्स यंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होणे शक्य आहे. या तपासणी बाजार समिती किंवा अन्य यंत्रणेकडून करण्यात येत नाही. आता मात्र, वितरण अधिकारी खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक बाजार समितीत उपस्थित राहणार असल्याने या आर्द्रताशोधक यंत्राची तपासणी होणार आहे.
हमीपेक्षा कमी दराच्या खरेदीवर नियंत्रण
By admin | Published: January 15, 2017 12:10 AM