लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या २४ तासात पारा आणखी दोन अंशांनी कमी झालेला आहे. यामुळे जिल्ह्यास हुडहुडी भरली. साधारणपणे एक आठवड्यापसून तापमान सात ते १२ अंशाच्या आसपास आहे. यामुळे जनजीवन ढवळून निघाले आहे. गेल्या दोन दिवसांतील थंडी पिकांना बाधक ठरणारी आहे. गहू, हरभऱ्याचे एकवेळ ठीक मात्र, भाजीपाला पिकांना ही थंडी घातक ठरणारी आहे.यंदाच्या हंगामात जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीत रबीची आशा नाही. मात्र, काळ्या पोताच्या व संरक्षित सिंचनाची सुविधा असणाऱ्या जमिनीत मात्र, रबीची पेरणी झालेली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार एक लाख ६९ हजार ३४१ हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सद्यस्थितीत एक लाख सहा हजार १६३ हेक्टरमध्ये रबीची पेरणी झालेली आहे. याची ६२.६९ इतकी टक्केवारी आहे. सद्यस्थितीत हरभऱ्याची १,११,२३८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ८६,५६० हेक्टरमध्ये पेरणी आटोपली. दोन आठवड्यापूर्वी असलेल्या ढगाळ वातारणामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, लगेच वातावरण कोरडे झाल्याने शेतकऱ्यांना व्यवस्थापन करता आले. गव्हाच्या पेरणीसाठी थंडावा आवश्यक असल्याने ५६,२१४ हेक्टरपैकी १८,७१९ हेक्टरमध्ये सध्या पेरणी झालेली आहे. ही ३२.७२ टक्केवारी आहे. विहिरीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने कमी आल्याने गव्हाचे ५० टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे.सलग दोन दिवसांपासून ५ ते ६ अंशांच्या दरम्यान तापमान असल्याने तुरीच्या पिकासह टोमॅटो व केळीचे पीक अतिथंडीमुळे करपण्याची शक्यता कृषीतज्ज्ञांनी वर्तविली आहे.थंडीचे व्यवस्थापन महत्त्वाचेसध्याचे तापमान गहू, बरभरा पिकाला पोषक आहे. मात्र, ५ अंशांपर्यंत घसरल्यास त्याला शीतलहर (कोल्ड वेव्ह) म्हटले जाते. या परिस्थितीचा प्रामुख्याने टोमॅटो, तूर, मिरची, कांदा व सर्वाधिक केळीच्या पिकाला धोका आहे. पानातील प्रोटोप्लॉझ्माचे क्रिस्टलायझेशन होत असल्याने पिकाला याचा धोका उत्पन्न होतो व पीक जागीच वाळायला सुरूवात होते. यापूर्वी सन २०११ मध्ये तापमान पाच अंशावर गेल्यामुळे शीतलहरेचा धोका निर्माण झाला होता. अनेक शेतामधील टोमॅटो, केळी, मिरची, कांदा व तुरीचे पीक जाग्यावरच सुकले होते. नदी-नाल्याकाठच्या शेतात शेकोटी पेटवाव्यात, मल्चींग आदी उपाययोजना कराव्यात. ज्या शेतात धुºयावर झाडे नाहीत त्या शेतात मात्र, काही प्रमाणात नुकसान होऊ शकते.
शीतलहर भाजीपाला पिकांना बाधक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:21 PM
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गेल्या २४ तासात पारा आणखी दोन अंशांनी कमी झालेला आहे. यामुळे जिल्ह्यास हुडहुडी भरली. ...
ठळक मुद्देदुसऱ्या दिवशीही पारा ५.२ अंशावर : कांदा, केळी,तूर, मिरची टोमॅटोला घातक