शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

महापालिका आयुक्तांच्या वक्तव्यावर वादंग

By admin | Published: September 05, 2015 12:13 AM

महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी येथील एकवीरा व अंबादेवीबाबत गुरुवारी केलेल्या असंवैधानिक वक्तव्याने वादंग उठले आहे.

हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संताप : अंबा, एकवीरा देवीबाबत अपमानजनक वक्तव्यअमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी येथील एकवीरा व अंबादेवीबाबत गुरुवारी केलेल्या असंवैधानिक वक्तव्याने वादंग उठले आहे. हिंदू धर्मियांच्या देवी, देवतांना एकेरी भाषेचा उल्लेख करुन काय साध्य करायचे आहे, असा सवाल विश्व हिंदू परिषदेने शुक्रवारी आयुक्तांना जाब विचारताना केला.आयुक्त गुडेवार यांनी गुरुवारी महापालिकेत ‘भारत स्वच्छ अभियान’ या योजनेंतर्गत वैयक्तिक शौचालय देण्याच्या अनुषंगाने आरोग्य निरीक्षकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अधिकारी वर्गदेखील उपस्थित होता. यावेळी आयुक्तांनीे आरोग्य निरीक्षकांना मार्गदर्शन करताना कर्तव्याविषयीचा मुद्दा बाजुला ठेवून ते थेट येथील अंबादेवी, एकवीरा देवी मंदिर मोजणीच्या विषयाला त्यांनी हात घातला. ‘मी यापूर्वी अंबादेवी, एकवीरा देवी मंदिराची मोजणी केली. एवढेच नव्हे, तर मंदिराच्या विश्वस्तांची घरेदेखील मोजली. परंतु माझे काहीही झाले नाही', असे ते बोलले. आयुक्तांनी केलेले हे वक्तव्य रेकॉर्डिंग केले आहे. त्यांनी शहरातील प्राचीन अंबादेवी, एकवीरा देवी मंदिराविषयी केलेल्या वाचाळ वक्तव्याचा विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने तीव्र शब्दांत शुक्रवारी निषेध नोंदविला. विश्व हिंदू परिषदेचे विजय शर्मा यांच्या नेतृत्वात हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त गुडेवार यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या वक्तव्याचा जाब विचारला. यावेळी विहिंपच्या कार्यकर्त्यांचे आयुक्तांनी ऐकून घेतले. मात्र आयुक्तांनी उद्भवलेला प्रसंग साधून देवीबाबतचे वक्तव्य चूक झाल्याचे मान्य केले. परंतु विहिंपच्या कार्यकर्त्यांनी माफी मागून चालणार नाही, जाहीर खुलासा करण्याची मागणी केली. त्यानंतर हा वाद निवळला. देवी, देवतांबद्दल चुकीचे विधान केले तर याचे गंभीर परिणाम होतील, असा निर्वाणीचा इशारा विहिंपचे विजय शर्मा, युवा सेनेचे राहुल माटोडे, अनिल साहू, शरद अग्रवाल, संदीप बेहरे, विपीन गुप्ता आदी हिंदूत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.कोणत्याही धर्माबद्दल उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी असंवैधानिक व्यक्तव्य करणे बरोबर नाही. अंबा, एकवीरा देवी यांच्याबद्दल काही बोलले असेल तर विषय गंभीर आहे. जनतेच्या आस्थेचा विषय असून आयुक्तांच्या वक्तव्याची चौकशी केली जाईल.- प्रवीण पोटे, पालकमंत्री, अमरावती.देवींबद्दल केलेल्या वक्तव्याची आयुक्तांनी जाहीर माफी मागावी. स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी देवी, देवतांचे अपमान सहन केले जाणार नाही. यापुढे वाचाळासारखे आयुक्त बोलले तर ते शब्द त्यांच्यात घशात उतरविले जातील.- तुषार भारतीय, शहराध्यक्ष, भाजप.हिंदूंच्या देवी, देवतांबद्दल अपमानजक वक्तव्य करणे योग्य नाही. आयुक्त पदावर असलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे म्हणजे, त्यांचे ब्रेन मॅपिंग करण्याचा प्रसंग आला आहे. यापुढे आयुक्तांनी असे विधान केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील.- प्रवीण हरमकर, विरोधी पक्षनेता.ंकर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे, यासाठी मी यापूर्वी अंबादेवी, एकवीरा देवी मंदिराची मोजणी केली, या कर्तव्य भावनेचा उल्लेख केला होता. मात्र कुणाच्या भावना दुखावल्यास दिलगिरी व्यक्त करतो.-चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका.सलग तीन वेळा एकवीरा व अंबादेवीबाबत अपमानास्पद वक्तव्य केले आहे. जनतेच्या आस्थेला हात घालण्याचा अधिकार आयुक्तांना नाही. धार्मिक भावना दुखावू नये, अन्यथा गंभीर परिणाम होतील.-दिगंबर डहाके, माजी शहराध्यक्ष, शिवसेना