शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

रयतेचीही व्हावी सोय!

By admin | Published: November 27, 2014 11:26 PM

केवळ मुख्यमंत्री येणार म्हणून सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधले गेले. आकर्षक फुटपाथ निर्माण केले गेलेत. तुंबून वाहणारे, दुर्गंधी अन् आजारांचा फैलाव करणारे कचऱ्याचे मोठ्ठे कंटेनर

अमरावती : केवळ मुख्यमंत्री येणार म्हणून सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधले गेले. आकर्षक फुटपाथ निर्माण केले गेलेत. तुंबून वाहणारे, दुर्गंधी अन् आजारांचा फैलाव करणारे कचऱ्याचे मोठ्ठे कंटेनर मार्गातून अचानक गायब झाले. निधीचा सुकाळ असावा अशा मानसिकतेने त्या परिसरात कामे करण्यात आलीत. साफसफाईसाठीही तरसणाऱ्या नागरिकांना ते सर्व स्वप्नवतच वाटत होते. मुख्यमंत्री आगमनाच्या वर्दीने हे सर्व घडत होते.हे अवघे राज्य चालविणारे मुख्यमंत्री याच राज्यातील आहेत. ते याच व्यवस्थेत वाढले आहेत. सामान्य नागरिक ज्या व्यवस्थेत राहतात त्या व्यवस्थेत मुख्यमंत्रीदेखील राहूच शकतात, इतके ते जमिनीशी जुळलेले आहेत! केवळ मुख्यमंत्री येणार म्हणून सामान्य नागरिकांनी पदरमोड करून भरलेल्या करापोटीचा निधी असा वारेमाप उधळण्याची खरच गरज होती काय? नम्र अन् शालिन स्वभावाचे, सामान्यांचे प्रतिनिधीत्त्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तरी तशी अपेक्षा असेल काय? कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन देण्याची सोय नसलेल्या महापालिकेला केवळ एका व्यक्तीच्या सोयीसाठी सामान्यांचा पैसा उधळताना एकदातरी विचार करायला नको होता काय? हा बडेजाव बघून 'लोकांच्या मुख्यमंत्र्यां'ची शाबासकी मिळविण्यात महापालिका यशस्वी होणार आहे काय? बालाजी प्लॉट परिसरात रस्ते झाले ती आनंदाचीच बाब झाली. त्यानिमित्ताने त्या परिसरातील लोकांची समस्या सुटली; तथापि त्या कार्यामागे लोकांची सुविधा करण्याचा जराही हेतू महापालिकेचा नव्हता. मानस होता तो मुख्यमंत्र्यांना खूश करण्याचा. आमचा सवाल महापालिकेच्या त्या मानसिकतेवर आहे. सामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे आद्य कर्तव्य करदात्या सामान्यजनांची सोय करणे हे आहे. महापालिकेला हा विसर का पडावा? मुख्यमंत्री महोदय, अमरावतीकरांना जशी व्हीव्हीआयपी बघण्याची सवय झाली आहे ना, तशीच त्या व्हिव्हिआयपींसाठी सामान्यांचा पैसा खर्ची घालताना बघणेही अंगवळणी पडले आहे. माजी राष्ट्रपती आणि माजी राज्यपाल यांच्या काँग्रेसनगरातील निवासस्थानांसमोरील रस्ते असेच अचानक भलेमोठे, काळेशार अन् चकचकित झाल्याचे अमरावतकरांनी बघितले आहे. बगिच्यात झाडे नसतील परंतु या रस्त्यांवरची हिरवळ तळहातावरील फोडांप्रमाणे जपल्याचे अमरावतीकरांनी अनुभवले आहे. आमदारांच्या घरांसमोरील स्वच्छता अन् टापटीप नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सामान्यजन भरत असलेल्या करांचा उपयोग व्हिव्हिआयपींच्या सोईसाठी करायचाच असतो हे नेहमीचे समिकरण आपल्याबाबत मात्र अपेक्षित नव्हते. आपण 'जरा हटके' आहात. आपल्या रूपाने सामान्य माणूस मुख्यमंत्री झाल्याचा भास नागरिकांना होतो. आपल्यासाठी सर्वसामान्यांच्या पैशांची उधळण झाली नि आपल्या आगमनाइतकीच त्या मुद्याचीही शहरात चर्चा झडली. आपल्यासाठी जी सोय झाली ती अमरावतीतील आपल्या रयतेसाठीही व्हावी, इतकेच!