अमरावती : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गात संक्रमितांच्या मृत्यूचे प्रमाणात वाढ झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. गुरुवारी पुन्हा १० संक्रमितांचा उपचारादरम्यान मृत्यूृ झाल्याने जिल्ह्यात बाधितांच्या मृत्यूची संख्या ७४९ वर पोहोचली आहे. याशिवाय ५३४ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५४,४९७ झालेली आहे.
जिल्ह्यात बुधवारी २,७५७ कोरोना चाचण्या करण्यात आल्यात. यामध्ये रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे प्रमाण १९.३६ टक्के असल्याची नोंद झालेली आहे. जिल्हा सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने तेथील रुग्ण जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्याचसोवत जिल्ह्यातही रुग्णसंणख्या वाढायला लागली लागली आहे. विशेष म्हणजे जिल्हा ग्रामीणमधील काही तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. त्यामुळेही जिल्ह्याची चिंता आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व रुग्णालयांना २५ टक्के बेड जिल्ह्यातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिलेले आहे. यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची पाहणी करून आरोग्य यंत्रणेसोबत संवाद साधला.
बॉक्स
२४ तासांत १० संक्रमितांचा मृत्यू
(कृपया तीन ते चार ओळी जागा सोडावी, माहिती यायची आहे)