अमरावती : जिल्ह्यात शनिवारी ११ कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बाधितांच्या मृत्यूची संख्या ७६३ झालेली आहे. याशिवाय अन्य तीन जिल्ह्यातील सात रुग्णांचा उपचारादरम्यान येथेच मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १८ झालेली आहे. याशिवाय ७९९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संक्रमितांची संख्या ५५,९७६ झालेली आहे.
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा ग्राफ चढताच आहे. आठ-दहा दिवसांत पहिल्यांदा चाचण्यांची संख्या ४,८६० झालेली आहे. यात १६.४४ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद झाली. जिल्ह्यात संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासन सातत्याने नवे बंधने आणत असताना बहुतेक ठिकाणी नियमांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे प्रशासन आता कठोर निर्बंध लावण्याचे मानसिकतेत आहे. महापालिका क्षेत्रात राजापेठ, राजकमल व इतवारा बाजारात अनावश्यक बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींची रॅपिड अँटिजेनच्या चाचण्या करण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यात : १ जानेवारीपासून आतापर्यंत ९,०५३ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. याशिवाय ५,४४० रुग्णांना संक्रमणमुक्त करण्यात आले. याच कालावधीत ८६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना संक्रमितांचा मृत्यूदेखील वाढत असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
बॉक्स
२४ तासांत जिल्ह्यात ११ मृत्यू
जिल्ह्यात २४ तासांत उपचारादरम्यान ११ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यात अंजनसिंगी, धामणगाव रेल्वे येथील ६३ वर्षीय पुरुष, आमला विश्वेश्वर, चांदूर रेल्वे येथील ५९ वर्षीय पुरुष, कवठा, चांदूर रेल्वे येथील ५२ वर्षीय पुरुष, चांदूरबाजार येथील ६५ वर्षीय महिला, चिखली येथील ७० वर्षीय पुरुष, धामणगाव रेल्वे येथील ६८ वर्षीय महिला, अंजनगाव सुर्जी येथील ६५ वर्षीय पुरुष, तिवसा येथील ७३ वर्षीय महिला, वरूड येथील ५० वर्षीय महिला व धारणी येथील ६९ वर्षीय पुरुष व अमरावती येथील राधानगरातील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बाॅक्स
अन्य जिल्ह्यांतील सात रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात उपचार घेताना अन्य जिल्ह्यातील सात रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे. यामध्ये भंडारा येथील ४४ वर्षीय महिला, यवतमाळ येथील ६१ वर्षीय पुरुष, सावनेर, नागपूर येथील ६५ वर्षीय पुरुष, नागपूर येथील ६१ वर्षीय पुरुष, नागपूर येथील ६६ वर्षीय पुरुष, खदान, नागपूर येथील ५२ वर्षीय पुरुष व रामकृष्णनगर, नागपूर येथील ३२ वर्षीय महिलेचा यामध्ये समावेश आहे. या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला