अमरावती : जिल्ह्यात उपचारादरम्यान १३ मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूंची संख्या १,३०३ वर पोहोचली आहे. याशिवाय ७०१ पॉझिटिव्हची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ८५,२९९ झालेली आहे.
जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कमी आल्याने काहीअंशी दिलासा मिळाला आहे. बुधवारी ३,५४१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात १९.७९ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद झालेली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार बुधवारी उच्चांकी १,१३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्त नागरिकांची संख्या आता ७४,२८४ वर पोहोचली आहे. एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत ही ८७.०९ टक्केवारी आहे. सद्यस्थितीत ९,७१२ सक्रिय रुग्ण आहेत. यात २,०४९ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे. याशिवाय उर्वरित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
बॉक्स
बुधवारी २४ तासांतील मृत्य
जिल्ह्यात उपचारादरम्यान येथील ६५ वर्षीय महिला, उत्कर्ष हाऊसिंग सोसायटी, ७६ वर्षीय महिला, प्रार्थना कॉलनी तसेच ग्रामीणमधील ६५ वर्षीय पुरुष, परतवाडा, ४५ वर्षीय महिला, धामणगाव रेल्वे, ४५ वर्षीय पुरुष, चिखलदरा, ८० वर्षीय महिला, बोरगावपेठ, ४५ वर्षीय महिला, साहूर, वलगाव, ७६ वर्षीय पुरुष, देऊखेड, ७५ वर्षीय पुरुष, उत्तमसरा, ५७ वर्षीय पुरुष, अंजनगाव सुर्जी, ५६ वर्षीय पुरुष, चांदूर रेल्वे, ४८ वर्षीय पुरुष, मोर्शी, ७५ वर्षीय पुरुष, पिंपळखुटा या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.