अमरावती : जिल्ह्यात आतापर्यंत दगावलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ७७७ झाली आहे. रविवारी १४ कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, शिवाय अन्य जिल्ह्यांतून उपचारासाठी आलेल्या आठ कोरोनाग्रस्तांचा रविवारी मृत्यू झाला. ५९६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५६,५७२ झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच आहे. रविवारी ३८५४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधून ५९६ पॉझिटिव्हची नोंद झाली. पॉझिटिव्हिटी १५.४६ टक्के आहे. जिल्ह्यात मृत्यूचे सत्र सुरू असल्याने चिंतेत भर पडली आहे. याशिवाय नागपूर, यवतमाळ, वर्धा व मध्य प्रदेशातील २५० हून अधिक रुग्ण जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झाले, तर ६५ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला . या मृतांची नोंद त्यांच्या जिल्ह्यात होणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
शहरात संचारबंदी दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना चौकाचौकांत अटकाव करण्यात येऊन त्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे. यामध्येही दोन दिवसांत ११ पॉझिटिव्हची नोंद झाली आहे. या व्यक्तींना अटकाव केला नसता, तर त्यांच्यापासून कितीतरी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला असता. हीच मोहीम आता तालुक्यांच्या मुख्यालयीदेखील राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या मुक्त संचाराला आळा बसावा व अकारण बाहेर ीफिरणारे पॉझिटिव्हदेखील निष्पन्न व्हावे, हा या मोहिमेमागचा उद्देश असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
बॉक्स
२४ तासांत १४ जणांचा मृत्यू
पाच ओळी जागा सोडावी
बॉक्स
अन्य जिल्ह्यांतील रुग्णांचे आठ मृत्यू
तीन ते चार ओळी जागा सोडावी