(असाईनमेंट)
अमरावती : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे सध्या मायक्रो प्लानिंग सुरू आहे. या अनुषंगाने ९४ आईस लॅन्ड रेफ्रिरजरेटर (आयएलआर) मध्ये १५ हजार ८८० लस साठवणूक करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी याशिवाय खासगी सेवा देणारे डॉक्टर्स अशा १८ हजार व्यक्तींना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाचे नियोजन आता अंतीम टप्यात आलेले आहे.
यासंदर्भात आरोग्य विभागातील संबंधितांना पूर्वप्रशिक्षण देण्यात आलेले आहे. जिल्ह्यात प्रत्येकी ६ जणांची एक अशा १०० टिमद्वारे हे लसीकरण ठरविलेल्या केंद्रांवर होणार आहे. या पथकांत एक डॉक्टर, दोन एएनएम, एक पोलीस कर्मचारी व एक अटेंडंट राहणार आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रात १३ व ग्रामीणमध्ये ८७ टीम राहणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. माहितीप्रमाणे व्हेरीयस व्हॅक्सिन, व्हायलर व्हेक्टर व्हॅक्सिन, नेवेलिक ॲसिड व्हॅक्सिन व प्रोटीन बेस्ड व्हॅक्सिनचा समावेश राहणार आहे. जिल्ह्यात कोणती लस येणार व डोस कशाप्रकारे देणार, याविषयी अद्याप कोणतीही माहिती आरोग्य विभागाला प्राप्त झालेली नाही.
लसीकरणासाठी शासनस्तरावरून अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सुचना जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या नाहीत. महापालिका क्षेत्रात पीडीएमसी व नर्सिंग प्रशिक्षण केंद्रात व ग्रामीण भागात पीएचसी व ग्रामीण रुग्णालयात ही लसीकरण केंद्रे राहणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. दरम्यान शीतगृहासाठी आयएलआर जिल्ह्यात प्राप्त होत आहेत.
बॉक्स
शीतगृहांची जय्यत तयारी
कोरोना लस साठवणुकीकरिता शीतकरणगृह तयार करण्याची प्रक्रिया सध्या जोरावर सुरू आहे. त्याचे तापमान किती असावे याविषयी स्पष्टता अद्याप झालेली नाही. यामध्ये पीएचसी, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य कार्यालय व जिल्हा व्हॅक्सिन भांडार या ठिकाणी लस साठवणूक करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रत्येकी २०० लीटर क्षमतेचे आयएलआर ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने संगितले.
बॉक्स
शीतगृहांची जय्यत तयारी विभागीय शीतगृहापासुन ते तालुक्यातील पीएचसीच्या केंद्रांपर्यंत व्हॅक्सिन व्हॅनद्वारे लस पोहोचविण्यात येणार आहे. लस साठवणुकीकरिता महापालिका क्षेत्रात १६, तर ग्रामीणमध्ये ७८ कोल्ड, असे एकूण ९४ कोल्ड चेन पॉईंट तयार करण्यात आलेले आहे. या ठिकाणी लसीची उणे तापमानात साठवणूक करण्यात येणार आहे. यासाठी अंतिम नियोजन तयार करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
कोट
कोरोना लसीकरण संर्दभात जिल्ह्यात सध्या मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे. साधारणपणे १८ हजार व्यक्तींना पहिल्या टप्प्यात ही लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात १०० टिमद्वारे हे लसीकरण होईल. यासाठी त्यांचे पुर्वप्रशिक्षण आटोपले आहे. लसीकरणाऱ्या व्यक्तींची माहिती संगणकात भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
- शौलेश नवाल,
जिल्हाधिकारी